Home /News /technology /

Tata च्या Car मध्ये Tesla सारखे फीचर्स, विना ड्रायव्हर चालेल कार; पाहा कसं करेल काम

Tata च्या Car मध्ये Tesla सारखे फीचर्स, विना ड्रायव्हर चालेल कार; पाहा कसं करेल काम

टाटाच्या अविन्या (Tata Avinya) या आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये टेस्लासारखीच ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स (Autonomous Driving Feature) मिळू शकतात अशी चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे. यालाच ऑटोपायलट फीचर (Autopilot Feature) असंही म्हटलं जातं.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 3 मे : टाटा मोटर्स (Tata Motors) ही देशातली इलेक्ट्रिक व्हेइकल्स (EV) इंडस्ट्रीमधली एक अग्रगण्य कंपनी आहे. दुसरीकडे एलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीला भारतात अजूनही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. टेस्लाच्या लाँचिंगसाठी सरकारसोबत सतत चर्चा सुरू आहे. अशातच एक बातमी आली आहे. टाटाच्या अविन्या (Tata Avinya) या आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये टेस्लासारखीच ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स (Autonomous Driving Feature) मिळू शकतात अशी चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे. यालाच ऑटोपायलट फीचर (Autopilot Feature) असंही म्हटलं जातं. या फीचरमुळे ही कार पॅसेंजरशिवायही चालू शकते. टाटाची अविन्या इलेक्ट्रिक कार (Tata Avinya Electric Car) 2025 पर्यंत भारतामध्ये लाँच होऊ शकते. ‘लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम’वर याबाबतची अधिक माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्या आर्किटेक्चरवर अविन्या कार आधारलेली आहे, ते सगळे फीचर्स लेव्हल 3 मधली (Level 3 Features) किंवा त्याहीपेक्षा वरची आहेत. ऑटोनॉमस टेक्नॉलॉजी लेव्हल सपोर्ट (Autonomous Technology Level Support) उच्च असेल, असं टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये प्रॉडक्ट लाइन अँड ऑपरेशन्सचे व्हाइस प्रेसिडंट आनंद कुलकर्णी यांनी टाटा अविन्याच्या इव्हेंटमध्ये सांगितलं. त्यामुळेच टाटा मोटर्सच्या भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्येही हे खास फीचर असू शकतं. टाटा अविन्यामध्ये खास काय असेल? अविन्या ही टाटाची लक्झरी कार आहे. तिला Pure EV थर्ड जनरेशन आर्किटेक्चरनुसार तयार करण्यात आलं आहे. भारताबरोबरच ग्लोबल मार्केटमध्येही ही कार सादर केली जाणार आहे. कोणाचंही लक्ष खेचून घेईल इतकी ही कार आकर्षक असेल. ती एक हॅचबॅक, एमपीव्ही आणि एक क्रॉसओव्हर यांच्यामधलं मॉडेल आहे. यामध्ये अगदी अनोखं असं ‘टी’ लाइट सिग्नेचर, बटरफ्लाय डोअर आणि फिरणाऱ्या सीट्स दिल्या गेल्या आहेत. पुढच्या बाजूला मोठं ब्लॅक पॅनेल, LEDDRL आणि ब्लॅक बोनेट असेल. साइड प्रोफाइलला मोठ्या अलॉय व्हील्ससह कारच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी रुंद दरवाजे आहेत. अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स, सेंटर कन्सोलवर एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि एका खास आकाराचं स्टीअरिंग व्हील, ऑल-डिजिटल इस्ट्रुमेंट क्लस्टर आदी सुविधा यात असतील. यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफही आहे. फुल चार्ज असताना ही कार 500 किलोमीटर्सपर्यंत चालू शकते. ड्रायव्हरच्या मदतीशिवाय कार चालवणं यालाच ऑटोनॉमस ड्रायव्हिंग किंवा ऑटोपायलट (Autonomous Driving Or Autopilot) असं म्हटलं जातं. हे तंत्रज्ञान विविध इनपुट्सच्या आधारावर काम करतं. उदाहरणार्थ मॅप (Map) म्हणजे नकाशासाठी हे थेट सॅटेलाइटशीच कनेक्ट (Directly Connected To Satellite) होतं. प्रवाशांना कुठे जायचं आहे ते ठिकाण नकाशामध्ये (Destination) सिलेक्ट केलं जातं. त्यानंतर मार्ग म्हणजे रूट (Root Selection) निवडला जातो. जेव्हा कार ऑटोपायलट मोडवर (Autopilot Mode) चालते तेव्हा सॅटेलाइटसह त्याला कारच्या चारही बाजूंनी दिल्या गेलेल्या कॅमेऱ्यामधूनही इनपुट मिळतं. म्हणजेच कारच्या पुढे किंवा डावीकडे-उजवीकडे काही अडथळा तर नाही ना हे समजतं. काही अडथळा असेल तर ही कार डाव्या-उजव्या बाजूला आपोआपच जाते किंवा थांबते. कारमध्ये अनेक सेन्सर्सही (Censors) आहेत. हे सेन्सर्स कारला लेनमध्ये ठेवण्यात मदत करतात आणि सिग्नल्सही बघतात, त्यांचा अर्थ समजून घेतात.  ऑटोपायलट मोडमध्ये कारचा वेग 112 किमी प्रति तास असतो. या तंत्रज्ञानात काही वेळेस सेन्सर्स काम करणं बंद करू शकतात. त्यामुळे अपघातही होण्याची शक्यता असते. टेस्लाच्या कार्समध्ये सुरुवातीपासूनच ऑटोपायलट फीचर्स (Autopilot Features) आहेत. अर्थात या फीचरमुळे अनेक अपघातही झाले आहेत. त्यामुळे या फीचरवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. अर्थात, ऑटोपायलट फीचरमुळे अपघात झालेले नाहीत असं स्पष्टीकरण कंपनीनं प्रत्येक वेळेस दिलेलं आहे. हे फीचर आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी काम करत आहे. टेस्लाच्या ऑटोपायलट फीचरमुळे दोन दुर्घटना झाल्या आहेत.

हे वाचा - सावधान! इंटरनेट कॅफेमधून E-Aadhaar डाऊनलोड करताय? UIDAI ने दिला महत्त्वाचा इशारा

2019 च्या ऑगस्टमध्ये बेंजामिन माल्डोनाडे त्यांचा 15 वर्षांचा मुलगा जोवानीसह कॅलिफोर्निया फ्रिवेच्या एका फुटबॉल स्पर्धेहून परत येत होते. रस्ता क्रॉस करत असताना त्यांनी त्यांच्या फोर्ड एक्सप्लोरर पिकअपचा वेग कमी केला. माल्डोनाडेने वळण्यासाठी सिग्नल दिला आणि ते डावीकडे वळले; पण अक्षरश: सेकंदाच्या आतच त्यांच्या पिकअपला टेस्ला मॉडेल 3 येऊन धडकली. ही कार ऑटोपायलट मोडवरून चालवली जात होती. तिचा वेग 96 किमी प्रति तास इतका होता अशी माहिती आहे. 2019 मध्येच अमेरिकेच्या होस्टन शहरात टेस्लाची एक कार भरधाव वेगाने जात होती. रस्त्यावर अचानक वळण आलं आणि कार पूर्णपणे अनियंत्रित होऊन एका झाडाला जाऊन धडकली. झाडाला धडकल्याक्षणी कारला आग लागली आणि त्यात बसलेल्यांना बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे आत बसलेल्यांचा जळून मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळेस गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर कुणीही नव्हतं अशी माहिती या अपघाताची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली. अपघात झाला तेव्हा कारच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला एक व्यक्ती बसली होती आणि मागच्या बाजूला दुसरी व्यक्ती बसली होती. या अपघातांची चौकशी सुरू आहे; पण या सगळ्या पार्श्वभूमीवर टाटा अविन्याबद्दलची उत्सुकता मात्र चांगलीच वाढली आहे.
First published:

Tags: Electric vehicles, Tata group, Tesla, Tesla electric car

पुढील बातम्या