मुंबई, 28 एप्रिल: आता घराघरांत इंटरनेट पोहोचलं असलं तरी काहीवेळेस नेटवर्क किंवा अन्य अडचणींमुळे आपल्याला इंटरनेट कॅफेमध्ये जावं लागतं. काही वेळेस काही महत्त्वाची कागदपत्रंही आपण कॅफेमध्ये डाऊनलोड करतो. मात्र, अशावेळेस खबरदारी घेणं गरजेचं आहे. विशेषत: जर तुम्हाला तुमचं ई-आधार कार्ड इंटरनेट कॅफेमधून (Downloading E-Aadhaar From Internet Cafe) डाऊनलोड करावं लागलं तर सावधान राहा असा इशारा युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) दिला आहे. UIDAI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सर्व आधार कार्डधारकांना हा इशारा दिला आहे. कोणत्याही सार्वजनिक कम्प्युटरवरून ई-आधार कार्ड डाऊनलोड करणं शक्यतो टाळा, असा इशारा त्यांनी दिला आहे. अशाप्रकारे डाऊनलोड केल्यानं कोणत्याही पब्लिक गॅजेटचा ताबा मिळवून चोरी करून त्याचा दुरुपयोग करणं शक्य असतं. त्यामुळे असं करणं अत्यंत धोकादायक आहे. सार्वजनिक कम्प्युटरवरून ई-आधार कार्ड डाऊनलोड करण्याशिवाय पर्यायच नसेल तर डाऊनलोड केलेल्या सगळ्या कॉपी डिलीट करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. आधार कार्डवर कार्डधारकाचं नाव, नवऱ्याचं किंवा वडिलांचं नाव आणि बोटांचे ठसे असतात. त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच UIDAI नं एक महत्त्वाचं ट्वीट करून इशारा दिला आहे. हे वाचा- कॉल रेकॉर्डिंग करताय तर हे वाचाच! 11 मे पासून बंद होणार ही सुविधा फसवणूक करणाऱ्यांपासून सावधान ! असं UIDAI नं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ई-आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी कृपया इंटरनेट कॅफे/कियॉस्कमधील सार्वजनिक कम्प्युटरचा शक्यतो वापर करु नका. तरीही सार्वजनिक कम्प्युटरचा वापर करायची वेळ आलीच तर कृपया डाऊनलोड केलेल्या सर्व कॉपी डिलीट करा, असंही या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
#BewareOfFraudsters
— Aadhaar (@UIDAI) April 26, 2022
To download an e-Aadhaar please avoid using a public computer at an internet café/kiosk.
However, if you do, then it is highly recommended to delete all the downloaded copies of #eAadhaar. pic.twitter.com/f3dylN1uDb
तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का याची माहिती तुम्हाला मिळवता येऊ शकते. त्यासाठी सर्वात आधी UIDAI ची वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा. आता तिथे खालच्या बाजूला Aadhar Services वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. नवीन पेजवर खालच्या बाजूला एक Authentication History असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. Authentication History च्या पेजवर आल्यावर तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका. आता Send OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आता 6 अंकी OTP येईल. हा 6 अंकी OTP टाकल्यावर Submit वर क्लिक करा. हे वाचा- ट्विटरचे नवे मालक! अखेर Elon Musk यांनी विकत घेतली कंपनी, मोजले इतके पैसे आता तुम्हाला जितक्या दिवसांची हिस्ट्री बघायची असेल त्याबाबतची माहिती भरून OTP व्हेरिफाय करण्यासाठी Verify OTP वर क्लिक करा. Verify OTP वर क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डबाबतची पूर्वीची अधिकृत माहिती (ऑथेंटिकेशन हिस्ट्री) येईल. तुमचं आधार कार्ड गेल्या सहा महिन्यांत कुठे आणि कधीकधी वापरलं गेलं आहे हे तुम्हाला या माहितीवरून कळेल. आधार कार्ड आपली ओळख पटवण्याच्या सगळ्यांत महत्त्वाच्या कागदपत्रांमधील एक आहे. UIDAI च्या वतीनं सर्व भारतीय नागरिकांना देण्यात आलेला हा एक 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. आधार ॲक्ट अंतर्गत E-Aadhaar लाही आधार कार्डची प्रत्यक्ष प्रत म्हणूनही मान्यता आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

)







