नवी दिल्ली, 1 एप्रिल : सुझुकी मोटरसायकल इंडियाने (Suzuki Motorcycle India) शुक्रवारी आपली नवी स्पोर्टी सुझुकी एवेनिस (Suzuki Avenis) स्कूटरचं स्टँडर्ड एडिशन लाँच केलं आहे. याआधी Suzuki ने एवेनिसच्या राइड कनेक्ट एडिशन (Suzuki Avenis 125 Ride Connect Edition) आणि रेस एडिशन (Suzuki Avenis 125 Race Edition) लाँच करण्याची घोषणा केली होती. लाँच झाल्याच्या तीन महिन्यांमध्ये Avenis ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सर्वात हलक्या स्कूटरपैकी एक आहे Avenis - Avenis मध्ये FI टेक्नोलॉजीसह 125cc चं इंजिन आहे, जे 6,750rpm वर 8.7 PS पॉवर आणि 5,500rpm वर 10Nm टॉर्क जनरेट करतं. या स्कूटरचं वजन 106 किलोग्रॅम आहे. या सेगमेंटमध्ये ही सर्वात हलकी स्कूटर असल्याचं सांगण्यात आलं आहे. काय आहेत फीचर्स - या स्कूटरला हेडलँपसह टेल लँपमध्ये एलईडी लायटिंग मिळते. त्याशिवाय यात बाइकप्रमाणे इंडिकेटर्सही मिळतात. सुझुकीने स्कूटरमध्ये फ्यूल भरणं अधिक सोपं करण्यासाठी बाहेरील बाजूला एक फ्यूल कॅपही दिली आहे. अंडर-सीट स्पेसही सामिल आहे.
हे वाचा - 40000 रुपयांहून कमी किमतीत मिळतेय Honda Activa, पाहा काय आहे डील
सुझुकी मोटरसायकल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर सतोशी उचिदा यांनी सांगितलं, की भारतीय बाजारात Avenis ला ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. स्कूटर अतिशय चांगल्या इंजिन आणि अॅडव्हान्स स्पोर्टी डिझाइनसह लाँच करण्यात आली होती. आज Avenis स्कूटर सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर्सपैकी एक आहे. या नव्या ट्रिमची किंमत 86,500 इतकी आहे. मागील बेस ट्रिमच्या तुलनेत याची किंमत 200 रुपये स्वस्त आहे.
हे वाचा - Tata ते BMW सर्वच Cars च्या किमती वाढणार, 1 एप्रिलपासून इतकी होणार दरवाढ
दरम्यान, वाढत्या महागाईचा परिणाम कार निर्मात्या कंपन्यांवरही होतो आहे. अनेक कार निर्मात्या कंपन्यांनी कमर्शियल व्हीकल रेंज अर्थात कार्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर महागड्या मेटल्ससह सर्व कच्च्या मालाच्या किमती सतत वाढत आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानेच कमर्शियल वाहनांच्या किमती वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. टाटा मोटर्स ते अगदी BMW पर्यंतच्या, तसंच सर्वसामान्यांच्या बजेटपासून ते अति महागड्या अशा सर्वच रेंजमधील कार्सच्या किमतीत वाढ होत आहे.