Home /News /technology /

आता Jio च्या माध्यमातून घेता येणार विठुरायाचं ऑनलाइन दर्शन; फॉलो करा सोपी प्रोसेस

आता Jio च्या माध्यमातून घेता येणार विठुरायाचं ऑनलाइन दर्शन; फॉलो करा सोपी प्रोसेस

Vitthal Darshan Live in Jio TV: पंढरपूरचा विठूराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. सध्या आषाढी वारीच्या निमित्तानं फक्त महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील लाखो भाविक पंढरपूरच्या रवाना झाले आहेत. आता जिओ टिव्हीच्या माध्यमातून भाविकांना पांडुरंगाचं ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जुलै : पंढरपूरचा विठूराया (Lord Vitthal) म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. सध्या आषाढी वारीच्या (Ashadhi Vari) निमित्ताने लाखो वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्याची ओढ या वारकऱ्यांना लागली आहे. कधी एकदा पंढरपूरला (Vitthal Temple, Pandharpur) पोहोचतोय आणि पांडूरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतोय, अशी अवस्था प्रत्येक वारकऱ्याची झाली आहे. लाखो वारकरी तिकडे वारीमध्ये असले तरी असंख्य वारकरी किंवा भक्त असेही आहेत की ज्यांना काहीना काही कारणामुळं वारीला जाता आलं नाही आणि त्यामुळं त्यांना याची देही याची डोळा विठूरायाचं दर्शन घेता येणार नाही. परंतु असं तरी नाराज व्हायची गरज नाही. कारण तुम्हाला आता विठूरायाचं ऑनलाईन दर्शन (Online Vitthal Darshan on Jio TV App) घरबसल्या घेता येऊ शकतं. जिओने या आषाढी वारीच्या निमित्ताने विठूरायाच्या भक्तगणांसाठी खास भेट देऊ केली आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात जिओ टीव्हीच्या (Jio TV App) माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन भाविकांना घरबसल्या घेता येणार आहे. जिओनं आपल्या ग्राहकांना यंदा आषाढी एकादशीला दिलेली ही भेटच म्हणायला हरकत नाही. यामुळं भाविकांना विठूरायाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त एका क्लिकवर तुम्हाला आपल्या लाडक्या पंढरीनाथाचं दर्शन कधीही, कुठेही घेता येऊ शकते. हेही वाचा- तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा विठूरायाचे हे सुंदर स्टेटस; लाईक, शेअर्सचा पडेल पाऊस गेल्या काही दिवसांपासून आषाढी वारी सुरु आहे. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाली आहेत. मात्र कित्येकांना इच्छा असूनही विविध कारणांमुळे या वारीला जाता आलं नाही. या भक्तिमय काळात विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घ्यावं, अशी सुप्त इच्छा प्रत्येक भाविकाच्या मनात असतेच. हेच जाणून घेऊन जिओनं आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाइन दर्शनाचा मार्ग खुला केला आहे. तुम्ही आता घरबसल्या 24 तास पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकता. फक्त दर्शनच नाही तर तेथील महापूजा, अभिषेक तसेच इतर विधीही घरबसल्या पाहता येणार आहेत. कसं घ्यायचं ऑनलाइन दर्शन (How to get online Vitthal Darshan Online?) - जिओ टीव्हीवरून विठूरायाचं ऑनलाइन दर्शन घेण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये जिओ टीव्ही अ‍ॅप (JIO TV App) डाउनलोड करावं लागेल. त्याचप्रमाणं तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेऊ शकता. जिओ टीव्ही अ‍ॅप डाउनलोड केल्यावर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी  भाविक 'दर्शन' आयकॉन वर क्लिक करावं लागेल. आता तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी चॅनेलवर जावं लागेल. याच ठिकाणी तुम्हाला पांडुरंगाचं ऑनलाइन दर्शन घेता येईल. हेही वाचा- Whatsapp Status: तुमच्या व्हॉट्अप स्टेटसला ठेवा संताचे सुंदर विचार, दिवस होईल भक्तीमय जिओ टीव्हीवर या मंदिरांचंही घेता येतं लाईव्ह दर्शन- यापूर्वी जिओ टीव्ही वर श्री अमरनाथ, चार धाम, तुळजापूर, कोल्हापूर ची महालक्ष्मी, अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा यासारख्या देवतांचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून भाविक दररोज या देवतांचे लाईव्ह दर्शन घेतात.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Live video, Online, Reliance Jio, Vitthal, Vitthal mandir, Vitthal mandir pandharpur

    पुढील बातम्या