जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / टीव्ही पाहणाऱ्यासाठी TRAI कडून गिफ्ट! फक्त 130 रुपयांत 200 चॅनेल, असा आहे प्लॅन

टीव्ही पाहणाऱ्यासाठी TRAI कडून गिफ्ट! फक्त 130 रुपयांत 200 चॅनेल, असा आहे प्लॅन

टीव्ही पाहणाऱ्यासाठी TRAI कडून गिफ्ट! फक्त 130 रुपयांत 200 चॅनेल, असा आहे प्लॅन

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता टीव्ही पाहाणं आणखी स्वस्त होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जानेवारी: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता टीव्ही पाहाणं आणखी स्वस्त होणार आहे. त्याचं कारण म्हणजे 130 रुपयांमध्ये तुम्हाला तब्बल 200 चॅनल्स पाहायला मिळणार आहेत. TRAI ने यासंदर्भातील एक आदेश जारी केला आहे. या आदेशाची अमंलबजावणी 1 मार्चपासून होणार असल्याचं TRAI कडून सांगण्यात आलं आहे. TRAI ने वापरकर्त्यांसाठी केबल टीव्हीची नवीन दर यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत 130 रुपयांमध्ये 100 चॅनल्स पाहाता येत होते. त्याऐवजी तुम्हाला 200 चॅनल्स म्हणजे 100 अधिक चॅनल्स पाहता येणार आहेत. 1 मार्चपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जे चॅनेल 12 रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारतात, त्यांचा समावेश चॅनेल बुकेमध्ये करता येणार नाही. सगळ्या चॅनेल्सना त्यांचे दर 15 जानेवारीपर्यंत वेबसाईटवर जाहीर करणे ट्रायच्या नियमानुसार बंधनकारक आहे.

जाहिरात

हेही वाचा- आधार-पॅन लिंकिंगची मुदत पुन्हा वाढवली, या तारखेच्या आधी करा लिंक TRAI आयने 2018 रोजी एक नवीन दर प्रणाली लागू केली होती. ज्यामध्ये दर्शकांना जे चॅनेल पाहायचे होते, त्याचेच ते पैसे देतील. ग्राहकांना महिन्याला 130 रुपये आणि कर भरावा लागत होता. ज्यामध्ये 100 चॅनेल विनामूल्य मिळत होते. या व्यतिरिक्त, कोणत्याही ग्राहकांना त्यांच्या पॅकेजमध्ये दुसरे चॅनेल जोडू इच्छित असल्यास त्यांना प्रत्येक चॅनेलच्या दरानुसार पैसे द्यावे लागत होते. मात्र आता ग्राहकांना 130 रुपयांमध्ये 200 चॅनल्स पाहता येणार आहेत. टेलिकॉम नियामक प्राधिकरणच्या TRAI ने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. TRAI ने वापरकर्त्यांसाठी केबल टीव्हीची नवीन दर यादी जाहीर केली आहे. या दर 1 मार्च 2020 पासून लागू होणार आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर, वापरकर्त्यांना 130 रुपयांमध्ये २०० चॅनेलची निवड करता येणार आहे. या संबंधिची माहिती ट्रायने डीटीएच ऑपरेटरलाही दिली आहे. त्यानुसार केबल आणि डीटीएच ऑपरेटरला 15 जानेवारीपर्यंत वेबसाइटवर दरांची माहिती देण्यास सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: TRAI
  • First Published :
जाहिरात
जाहिरात