मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

Spyware in Android: तुमचे प्रायव्हेट फोटो लीक तर होत नाहीत ना? असं करा चेक

Spyware Lookup Tool: स्पायवेअर म्हणजे तुमच्यावर लक्ष ठेवणारे अ‍ॅप. अशा प्रकारच्या अ‍ॅप्सचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात होत आहे. नुकतीच एक यादी समोर आली आहे, ज्यामध्ये सर्व देशांतील वापरकर्त्यांचा डेटा समाविष्ट आहे.

  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 21 ऑगस्ट: स्पायवेअर अ‍ॅप्सबाबत (Spyware Apps in Android) एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अ‍ॅप्समुळे लाखो अँड्रॉइड यूजर्सचा पर्सनल डेटा लीक होत आहे. अशा अ‍ॅप्सचे बळी जवळपास प्रत्येक देशात सापडले आहेत. विशेषतः अमेरिका, युरोप, ब्राझील, इंडोनेशिया आणि भारतातामध्ये अशा लोकांची संख्या जास्त आहे.  या स्पायवेअरचे स्वरूप असं असतं की, बहुतेक वापरकर्त्यांना त्याची माहितीही नसते. याप्रकरणी टेकक्रंचनं धक्कादायक खुलासा केला आहे. स्पायवेअरचे काम हे आहे की, ते वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनमधून त्यांचा डेटा चोरतात. या डेटामध्ये तुमच्या वैयक्तिक फोटोंसह अनेक खात्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स देखील असू शकतात.

टेकक्रंचला या वर्षी जूनमध्ये एक Cache फाइल सापडली होती. ही फाईल TheTruthSpy च्या अंतर्गत नेटवर्कमधून टाकण्यात आली होती. या Cacheमध्ये लीक झालेल्या सर्व Android डिव्हाइसेसची माहिती होती आणि यामध्ये TheTruthSpy नेटवर्कमधील स्पायवेअर होता.

नावं अनेक, काम एक-

TheTruthSpy नेटवर्कमध्ये Copy9, MxSpy, iSpyoo, SecondClone, TheSpyApp, ExactSpy, GuestSpy आणि FoneTracker स्पायवेअरचा समावेश आहे. या सर्व अॅप्सची नावे भिन्न असू शकतात, परंतु हे सर्व अ‍ॅप्स समान आहेत. या यादीमध्ये स्मार्टफोन्सचे IMEI क्रमांक किंवा त्यांच्या यूनिक एडवरटाईजिंग आयडीचा तपशील समाविष्ट आहे. कॉम्प्राइज्ड डेटाच्या मदतीनं, टेकक्रंचनं स्पायवेअर लुकअप टूल विकसित केलं आहे. याच्या मदतीनं तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून स्पायवेअर काढू शकता. स्पायवेअर लुकअप टूल कसं कार्य करते ते आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा- Jio 5G कधी लाँच होणार? रिचार्जसाठी किती मोजावे लागणार पैसे? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

याप्रमाणे तपासू शकता

  • यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सुरक्षित उपकरणाची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा किंवा मित्राचा फोन किंवा संगणक वापरू शकता.
  • तुम्हाला त्या डिव्हाइसवरून https://techcrunch.com/pages/thetruthspy-investigation/ पेजवर जावं लागेल. येथे तुम्हाला IMEI आणि Ads ID चा पर्याय दिसेल.
  • तुमचा फोन या लीकमध्ये सामील आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला तुमचा IMEI नंबर किंवा Ads ID येथे टाकावा लागेल.
  • तुमच्या फोनचा अ‍ॅड्स आयडी बदलला असेल तर समजा की स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर इन्स्टॉल केले आहे. अशा परिस्थितीत हे साधन तुम्हाला मदत करू शकणार नाही. दुसरीकडे, लुकअप टूलवर मॅच दिसल्यास, याचा अर्थ असा होतो की लीक झालेल्या यादीमध्ये तुमचा फोनही समाविष्ट आहे.
  • 'Likely Match' दिसत असल्यास, याचा अर्थ तुमचा IMEI डेटा किंवा जाहिराती आयडी रेकॉर्डमध्ये सापडला आहे परंतु त्यात जास्त डेटा नाही. जर कोणताही मॅच रिझल्ट दिसत नसेल, तर याचा अर्थ तुमचा डिव्हाइस सुरक्षित आहे.

First published:

Tags: Android, Hacking, Smartphone, Spyware