Home /News /technology /

महिन्याला केवळ 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा, फ्री कॉलिंगसह अनेक फायदे

महिन्याला केवळ 125 रुपयांचा रिचार्ज करून वर्षभर मिळवा फायदा, फ्री कॉलिंगसह अनेक फायदे

एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि वोडाफोन-आयडिया (VI) सारख्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी काही स्वस्त दरातील रिचार्ज प्लॅन आणले आहेत, ज्याची वॅलिडिटी 1 वर्षापर्यंत आहे आणि हे रिचार्ज प्लॅन महिन्याच्या हिशोबाने 125 रुपयांहून कमी किंमतीत आहेत.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 10 मे : अधिकतर लोक दर महिन्याला आपल्या फोनचा रिचार्ज करतात. पण दर महिन्याला करावा लागणार रिचार्ज काहीसा महाग पडतो. एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि वोडाफोन-आयडिया (VI) सारख्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी काही स्वस्त दरातील रिचार्ज प्लॅन आणले आहेत, ज्याची वॅलिडिटी 1 वर्षापर्यंत आहे आणि हे रिचार्ज प्लॅन महिन्याच्या हिशोबाने 125 रुपयांहून कमी किंमतीत आहेत. एअरटेल (Airtel) - टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे पूर्ण वर्षभराची वॅलिडिटी देणारा प्लॅन 1,498 रुपयांत आहे. म्हणजे ग्राहकांना महिना केवळ 124.8 रुपयांच्या हिशोबाने पैसे द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3,600 मेसेज दिले जातात, याचीही वैधता वर्षभरासाठी आहे. या प्लॅनमध्ये 24 GB डेटा पूर्ण वर्षभरासाठी मिळतो. वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधेसह युजरला फ्री हॅलोट्यून्स, एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप प्रीमियम आणि अनलिमिटेड डाउनलोडसह, विंक म्युझिकचं सब्सक्रिप्शनही मिळतं.

  (वाचा - Netflixयुजर्ससाठी खास N-Plus सब्सक्रिप्शन;असा पाहता येणार Behind the Sceneकंटेंट)

  जिओ रिचार्ज प्लॅन (Jio) - रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना 1,299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करतं. हा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. महिन्याच्या हिशोबाने या प्लॅनसाठी 118 रुपये खर्च होतात. या प्लॅनमध्ये 24 GB डेटा संपूर्ण वर्षासाठी मिळतो. डेटा संपल्यानंतर स्पिड कमी होऊन 64Kbps होतो. या प्लॅनमध्ये 3,600 मेसेज मिळतात, जे 336 दिवसांपर्यंत वापरता येतात. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. तसंच जिओ Saavn, जिओ TV, जिओ सिनेमा आणि जिओ अॅपचं सब्सक्रिप्शनही मिळतं.

  (वाचा - Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक)

  वोडाफोन-आयडिया (VI) - वोडाफोन-आयडियामध्ये वर्षभराचा रिचार्ज प्लॅन 1,499 रुपयांत मिळतो. म्हणजे महिन्याला 124.91 रुपये महिन्याचा खर्च येईल. हा प्लॅन 365 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. VI च्या या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी 3,600 मेसेज, 24 GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही मिळते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Airtel, Reliance Jio, Reliance Jio Internet, Vodafone idea tariff plan

  पुढील बातम्या