मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सणासुदीला Online शॉपिंग करत असाल तर सावधान राहा, ई-कॉमर्स वेबसाइट्सवरुन होतेय भारतीयांची फसवणूक

सणासुदीला Online शॉपिंग करत असाल तर सावधान राहा, ई-कॉमर्स वेबसाइट्सवरुन होतेय भारतीयांची फसवणूक

देशात काही बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उदयाला आले असून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे.

देशात काही बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उदयाला आले असून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे.

देशात काही बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उदयाला आले असून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे.

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर: सध्या भारतात सणासुदीची धामधूम सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटातून काहीसा दिलासा मिळाल्यानं नागरिकांनी सणांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेकांनी तर ऑनलाइन खरेदीला (Online Shopping) देखील सुरुवात केली आहे. किरकोळ आणि मोठमोठ्या गोष्टी देखील ऑनलाईन उपलब्ध असल्यानं नागरिक देखील ऑनलाईन शॉपिंगला महत्व देताना दिसतात. त्यामुळं सणासुदीच्या काळात जास्तीत जास्त कमाई करण्याची संधी ई-कॉमर्स वेबसाईट्सला (E-commerce website) असते. मात्र, देशात काही बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उदयाला आले असून त्यांनी अनेक नागरिकांची फसवणूक केली आहे. फसवणुकीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं वृत्त टीव्ही 9 भारतवर्षनं दिलं आहे. भारतामध्ये काही बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करताना नागरिकांची फसवणूक (Fraud) होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. 'फेसबुक पेज अ‍ॅड नेटवर्क'चा वापर करून अशा वेबसाईट्स नागरिकांना गंडा घालत आहेत. वेलबाएमॉल डॉट कॉम (Wellbamall.com) हे असचं एक पोर्टल आहे ज्यानं हजारो भारतीयांना फसवलं आहे. या पोर्टलवरून अनेकांनी तांत्रिक उत्पादनं विकली जातात. मात्र, ऑर्डरचं पेमेंट केल्यानंतर हे पोर्टल बंदच झाल्याचा प्रकार समोर आला. वेबसाईटवर पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता ग्राहकांना चिनी भाषेत संदेश मिळत आहेत की वेबसाईट सापडत नाही. हेही वाचा-  तुमचा बँक अकाउंट Password चोरी तर नाही ना झालाय? बचावासाठी लगेच करा हे काम
 सायबर तज्ञांच्या माहितीनुसार, 'फेसबुक पेज अ‍ॅड नेटवर्क'चा (Facebook page ad network) वापर करून फसवणूक करणारे लोक, फेसबूक पेज किंवा प्रोफाइल तयार करतात. त्या माध्यमातून आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री सुरू करतात. फेसबुकवरील अशा जाहिरातीवर क्लिक केलं की, ग्राहक त्या संबंधित पोर्टलवर जातो. त्या ठिकाणी ऑर्डरसाठी पैसे भरल्यानंतर असे बनावट पोर्टल अचानक नाहीसं होतं, अशी या बनावट वेबसाईटच्या कामाची पद्धत आहे.
फसवणूक झालेल्या काही ग्राहकांनी आपले अनुभव सांगितले. सुजीत वर्मा नावाच्या एका व्यक्तीनं ऑनलाईन पेमेंट करून खरेदी केली. मात्र, त्यांना ऑर्डरची डिलिव्हरीच मिळाली नाही. सायबर फसवणुकीचे (Cyber fraud) बळी ठरलेल्या सुजीत यांनी scamadvisor.com वर आपला अनुभव पोस्ट केला आहे. सुनील गुप्ता यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यांनी एसएसडी (सॉलिड स्टेट ड्राइव) ऑर्डर केली होती. पेमेंट केल्यानंतर त्यांना त्या वेबसाईटकडून प्रतिसादचं मिळाला नाही. अशा बनावट वेबसाईटला फेसबुकचा सपोर्ट मिळत आहे. ही अतिशय वाईट गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुनील यांनी दिली आहे. गुडगावमध्ये राहणाऱ्या आयुषनं काही दिवसांपूर्वी स्मार्टफोनसाठी 1 हजार 668 रुपयांचा मिनी-पॉकेट चार्जर मागवला होता. मात्र, त्याला डिलिव्हरी मिळालीच नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताचं आयुषनं ई-कॉमर्स वेबसाईटविरोधात गुरुग्राम पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे (Cyber Crime Cell) तक्रार दाखल केली. हेही वाचा-  QR Code ने पेमेंट करताना सावधान, अशी घ्या काळजी "फेसबुककडं एखाद्या जाहिरातदारावर नियम आणि अटींअंतर्गत कारवाई करण्यासाठी फीडबॅक प्रोसेस आहे. मात्र, ही प्रणाली धीम्या गतीने काम करते. फसवणूक करणारे याचाच फायदा घेतात. हे घोटाळेबाज लोक फेसबुक पेजेसच्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करतात. तसेच आपल्या ई-कॉमर्स पोर्टलवरील स्वस्तातले आणि नकली चीनी प्रॉडक्ट ग्राहकांना दाखवून त्यांची दिशाभूल करतात", अशी माहिती सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी दिली. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन इत्यादी प्रमुख कंपन्यांचा वापर ऑनलाइन खरेदीसाठी करणं हा बनावट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला बळी न पडण्याचा एकमेव मार्ग असल्याचंही राजहरिया म्हणाले. हेही वाचा-  ...तर भारतात रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंद राहणार WhatsApp? जाणून घ्या काय आहे सत्य
 त्यामुळे जर तुम्ही देखील ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अतिशय काळजीपूर्वक खरेदी करा. नवीन असलेल्या ई कॉमर्स वेबसाईटचा वापर करणं शक्यतो टाळा.
First published:

Tags: Online fraud, Online shopping

पुढील बातम्या