मुंबई, 19 जुलै : सूर्याच्या पृष्ठभागावर कायम मोठे मोठे स्फोट होत असतात. परिणामी सूर्यातून मोठ्या प्रमाणात रेडिएशन बाहेर फेकली जातात, ज्याचा संपूर्ण सूर्यमालेवर प्रभाव पडतो. या रेडिएशनमुळे येणाऱ्या वादळाला सौरवादळ (Solar storm) किंवा जिओमॅग्नेटिक स्टॉर्म (Geomagnetic storm) म्हणूनही ओळखलं जातं. यामुळे भरपूर उष्णता वाढते, तसेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्येही (Electromagnetic radiation) मोठ्या प्रमाणात वाढ होते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, असंच एक सौरवादळ (Solar storm today) आज (19 जुलै) पृथ्वीला धडकणार आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अंतराळ हवामान अभ्यासक आणि फिजिसिस्ट डॉ. तमिथा स्कोव यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी सांगितलं आहे, की लवकरच ‘लांब सापासारख्या सोलर फ्लेअर्स पृथ्वीला धडकतील’. नासानेदेखील (NASA on Solar Storm) यापूर्वीच 19 जुलैला हे सौरवादळ पृथ्वीला धडकू शकतं असा अंदाज वर्तवला होता. याचा परिणाम (Solar storm effect) सॅटेलाईट, वीज, जीपीएस, रेडिओ, मोबाईल नेटवर्क अशा विविध गोष्टींवर होऊ शकतो.
अद्भुत! अँकरने बोट दाखवताच आकाशाकडे झेपावलं रॉकेट; परफेक्ट टायमिंगचा हा जबरदस्त Video तुफान व्हायरल
या गोष्टींवर होणार परिणाम
सौरवादळामुळे पृथ्वीवरील उंच भागातील वीज जाण्याचा धोका (Blackout) वर्तवण्यात येत आहे. सोबतच, रेडिओ सिग्नलवरही (Radio signal) याचा परिणाम होईल. पृथ्वीच्या वातावरणातील सगळ्यात वरच्या थरात असलेल्या कृत्रिम उपग्रहांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. तसेच, जीपीएस (GPS) आणि मोबाईल सिग्नलवरही (Mobile Signal) याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पृथ्वीवर ठिकठिकाणी ब्लॅकआऊट होऊन, बऱ्याच क्षेत्रांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
यापूर्वीही आले होते सौरवादळ
पृथ्वीवर सौरवादळ (Solar Storm in past) धडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1989 साली आलेल्या एका सौरवादळाचा परिणाम कॅनडा देशातील क्युबेक शहरावर दिसून आला होता. त्यापूर्वी 1859 साली आलेल्या एका सौरवादळामुळे अमेरिका आणि युरोपातील टेलिग्राफ नेटवर्क बंद पडलं होतं.
Shocking Video! 220 किलो वजन उचलताच फाटली छाती; बॉडी बनवण्याच्या नादात झाली भयंकर अवस्था
खरंतर सौरवादळ येण्याच्या घटना अगदी क्वचित घडतात. सूर्याच्या पृष्ठभागावर वारंवार मोठे स्फोट होत असतात. मात्र, त्यातील काहीच स्फोट एवढे मोठे असतात ज्यातून सौरवादळ येण्याची शक्यता असते. कित्येक वेळा सूर्यापासून निघालेले रेडिएशन बऱ्याच वेळा पृथ्वीपर्यंत पोहोचते. मात्र, पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असतं; जे आपल्याला या रेडिएशनपासून वाचवतं. सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जाते. सौरवादळांमुळे शास्त्रज्ञांना सूर्याचा आणखी अभ्यास करणे शक्य होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nasa, Storm, Technology