मराठी बातम्या /बातम्या /Viral /अद्भुत! अँकरने बोट दाखवताच आकाशाकडे झेपावलं रॉकेट; परफेक्ट टायमिंगचा हा जबरदस्त Video तुफान व्हायरल

अद्भुत! अँकरने बोट दाखवताच आकाशाकडे झेपावलं रॉकेट; परफेक्ट टायमिंगचा हा जबरदस्त Video तुफान व्हायरल

70 च्या दशकातील एका डॉक्युमेंट्री शोच्या शॉटने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

70 च्या दशकातील एका डॉक्युमेंट्री शोच्या शॉटने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

70 च्या दशकातील एका डॉक्युमेंट्री शोच्या शॉटने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India

लंडन, 18 जुलै : फिल्म, टीव्ही शोमध्ये एखादा शॉट आपल्याला आवडतो. अशाच एका शोमधील जबरदस्त शॉटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका डॉक्युमेंट्री शोचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये रॉकेट लाँचसंबंधी माहिती देणाऱ्या एका अँकरने जसं रॉकेटकडे बोट दाखवलं तसं रॉकेट आकाशात झेपावलं. 70 च्या दशकातील एका डॉक्युमेंट्री शोच्या शॉटने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता शोमध्ये एक अँकर अँकरिंग करतो आहे. त्याच्या मागे एक रॉकेट दिसतं आहे. अँकर आपल्या शोमध्ये रॉकेट लाँचसंबंधी माहिती देतो आहे. त्यानंतर तो मागे वळतो आणि त्या रॉकेटकडे बोट दाखवतो. जसं त्याचं बोट त्या रॉकेटला लागतं तसं रॉकेट उडतं. रॉकेट आकाशाच्या दिशेने झेप घेतं. शॉटच्या टाइमिंगसाठी हा सर्वात खास शॉट असल्याचं सांगितलं जातं.

हे वाचा - Shocking Video! 220 किलो वजन उचलताच फाटली छाती; बॉडी बनवण्याच्या नादात झाली भयंकर अवस्था

या व्हिडीओत दिसणाऱ्या अँकरचं नाव आहे जेम्स बर्क आहे. जे ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध इतिहासकार, लेखक आणि टीव्ही प्रेझेंटर आहेत. त्यांचे अनेक शोज सुपरहिट ठरले आहेत. ज्या शोमधील ही क्लिप आहे, त्याचं नाव आहे कनेक्शन्स. 1978 साली हा शो रिलीज झाला होता.

@lostinhist0ry ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने हा अनोखा व्हिडीओ पाहून हा व्हिडीओ खरा आहे, यावर  आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी सध्याच्या टीव्ही डॉक्युमेंट्री याच्यासमोर फेल असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - नाक आहे की चोच! नाकाचा उपयोग करून 53 वर्षांच्या व्यक्तीचा अनोखा विक्रम, पाहा Video

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Viral, Viral videos