मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Social Media Safety: तरुणांनो, सोशल मीडिया वापरताना रहा सावध; ‘या’ 8 गोष्टींची घ्या काळजी

Social Media Safety: तरुणांनो, सोशल मीडिया वापरताना रहा सावध; ‘या’ 8 गोष्टींची घ्या काळजी

Social Media Safety: तरुणांनो, सोशल मीडिया वापरताना रहा सावध; ‘या’ 8 गोष्टींची घ्या काळजी

Social Media Safety: तरुणांनो, सोशल मीडिया वापरताना रहा सावध; ‘या’ 8 गोष्टींची घ्या काळजी

Social Media Security Tips: अलीकडच्या काळातील तरुणाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. परंतु ही सोशल मीडिया वापरणारी मंडळी हॅकर्सच्या रडारवर असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 29 ऑगस्ट: अलीकडच्या काळातील तरुणाई सोशल मीडियावर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत सतत सोशल मीडिया साईट्सवर तरुण-तरूणी वेळ घालवत असतात. परंतु ही सोशल मीडिया वापरणारी मंडळी हॅकर्सच्या रडारवर असते. सोशल मीडियावरील हॅकर्स दररोज नवनवीन मार्गांनी फसवणूक करत असतात. अशा परिस्थितीत तरुणांनी आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या सर्वांनीच सर्व प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे. अलीकडेच भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे, सोशल मीडियावर सुरक्षित राहण्याचे 8 मार्ग सांगण्यात आले होते, ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

1-पब्लिक सर्चमधून तुमचे प्रोफाइल ब्लॉक करा-

फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असा पर्याय मिळतो. याद्वारे तुम्ही तुमचं प्रोफाइल सुरक्षित करू शकता. अशा प्रकारे प्रत्येकजण तुम्हाला शोधू शकणार नाही.

2- नेहमी लॉगआउट करा-

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरल्यानंतर नेहमी लॉगआउट करा. यामुळं हॅकिंगचा धोका कमी होतो. बर्‍याच वेळा आपण दुसऱ्याच्या लॅपटॉप, फोन किंवा पब्लिक माध्यमांवर लॉग इन करतो. त्यामुळे लॉगआउट करणं नेहमीच सुरक्षित असतं.

3- सोशल मीडियाचे तपशील शेअर करू नका-

तुमचा सोशल मीडिया तपशील जसे की पासवर्ड माहिती कोणाशीही शेअर करू नका. असं केल्यानं तुमचं खातं धोक्यात येऊ शकतं.

4-अज्ञात फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका-

सोशल मीडियावर सर्व प्रकारचे लोक असतात, त्यामुळं प्रत्येकाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. काही लोक फसवणूक करण्यासाठी बनावट खाती देखील तयार करतात.

5-घराचा/ऑफिसचा पत्ता शेअर करू नका-

सोशल मीडियावर अनेकवेळा आपण पोस्ट किंवा फोटो टाकण्यासोबत लोकेशन लिहितो. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर आपल्या घराचा किंवा कार्यालयाचा पत्ता टाकू नका, जेणेकरून कोणीतरी तुमचा माग काढू शकेल हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा- Smartphone Hack: सावधान! स्मार्टफोनमध्ये ‘ही’ चिन्हे दिसत असतील, तर समजून जा तुमचा फोन हॅक झालाय

6. अज्ञात लिंकवर क्लिक करू नका-

जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची लिंक आढळते. या लिंकमध्ये काहीवेळा विचित्र दावे केलेले असतात. अशा लिंकवर क्लिक करणं टाळा. हॅकर्स अशा लिंक पाठवतात, त्यावर क्लिक केल्यास खातं हॅक होण्याचा धोका असतो.

7- प्रायव्हसी सेटिंगची काळजी घ्या-

सोशल मीडियावर तुमची प्रायव्हसी सेटिंग्ज शक्य तितकी मर्यादित करा. पब्लिकसाठी प्रोफाइल अधिक सुरक्षितता करा.

8- फोटो, स्टेटस शेअर करताना काळजी घ्या-

सोशल मीडियावर फोटो, स्टेटस किंवा कमेंट पोस्ट करताना जास्तीत जास्त सावधगिरी बाळगा.

First published:

Tags: Digital prime time, Smartphone, Social media