मुंबई, 29 ऑगस्ट: एखाद्यानं तुमचा फोन हॅक (Smartphone Hack Signs) केलाय, असं तुम्हाला वाटतंय का? आता तुम्ही विचार करत असाल की आपला स्मार्टफोन हॅक केला गेलाय हे कसं कळेल? तर आपण अगदी सोप्या पद्धतीनं ते शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल. हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतात, म्हणजेच ते फोन हॅक करतात. तुमचा स्मार्टफोन हॅक झालाय हे तुम्ही काही लक्षणांवरून ओळखू शकता. एखाद्या रोगाची किंवा आजाराची काही लक्षणं असतात, तशी तुमचा स्मार्टफोन हॅक होण्याचीही काही लक्षणं आहेत. तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल ते आज आपण पाहणार आहोत.
खरंतर तुमचा स्मार्टफोन हॅक झालाय हे ओळखण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही. त्यापेक्षा काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुमचा फोन नेहमीपेक्षा वेगळा परफॉर्म करू लागला, तर हे फोन हॅक झाल्यामुळंही होऊ शकतं. उदाहरणार्थ, तुमच्या फोनची बॅटरी झपाट्यानं संपुष्टात येईल, त्यामुळे काही प्रकरणांमध्ये त्याचे सेन्सर पुन्हा पुन्हा डिटेक्ट होऊ लागतात. अशाच काही लक्षणांबद्दल आपण बोलणार आहोत.
1. फोनची बॅटरी वेगाने संपते-
याला हॅकिंगची टेस्ट तर म्हणता येणार नाही, पण हे लक्षण नक्कीच आहे. मालवेअर किंवा फसवणूक अॅपमुळे, तुमच्या फोनची बॅटरी सामान्य स्थितीपेक्षा वेगाने संपेल. कारण स्क्रीन बंद असतानाही हे अॅप्स काम करत असतात आणि तुमचा डेटा चोरत असतात. त्यामुळे बॅटरी झपाट्यानं संपते.
हेही वाचा- दिवाळीपूर्वी देशात लाँच होणार जिओ 5G, पहिल्या टप्प्यात मुंबईचाही समावेश, मुकेश अंबानींची घोषणा
2. हँडसेट स्लो होतो-
कालपर्यंत तुमचा फोन ठीक चालत होता आणि अचानक मंद झाल्यास अशा परिस्थितीत युजर्स म्हणतात, की त्यांचा स्मार्टफोन हँग झाला आहे, परंतु हे केवळ हॅंग झाल्यामुळंच नाही तर हॅकिंगमुळेही होतं. वारंवार स्क्रीन गोठणं, फोन क्रॅश होणं ही फोन हॅक झाल्याची सामान्य लक्षणं आहेत.
3. ऑनलाइन अकाउंट्स करा चेक-
तुम्हाला जर अकाऊंट लॉगिन मेसेज वारंवार मिळू लागले तरीही तुमचा फोन हॅकिंगचा बळी ठरू शकतो. तुमची सोशल मीडिया खाती देखील तपासा. जर तुम्हाला संशयास्पद लॉगिनची माहिती मिळाली तर समजा की कोणीतरी फोन हॅक केला आहे.
4. अज्ञात कॉल आणि एसएमएस देखील एक चिन्ह असू शकतात-
हॅकर्सनी तुमचा स्मार्टफोन ट्रोजन संदेशाद्वारे ट्रॅप केला असू शकतो. याशिवाय हॅकर्स तुमच्या जवळच्या व्यक्तीचा फोनही हॅक करू शकतात, ज्यामुळे ते तुमचा डेटा चोरू शकतात. त्यामुळं कोणत्याही एसएमएसमध्ये येणाऱ्या लिंकवर सावधपणे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hacking, Smartphone