Home /News /technology /

फक्त 9 मिनिटात 100 टक्के चार्ज होईल स्मार्टफोन! येत आहे 240W बाहुबली चार्जर

फक्त 9 मिनिटात 100 टक्के चार्ज होईल स्मार्टफोन! येत आहे 240W बाहुबली चार्जर

फक्त 9 मिनिटात 100 टक्के चार्ज होईल स्मार्टफोन! येत आहे 240W बाहुबली चार्जर

फक्त 9 मिनिटात 100 टक्के चार्ज होईल स्मार्टफोन! येत आहे 240W बाहुबली चार्जर

Smartphone Charging Technology: स्मार्टफोनचं चार्जिंग तंत्रज्ञानही गेल्या काही वर्षांत झपाट्याने सुधारले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, Xiaomi ने Xiaomi 11i हायपरचार्ज सादर केला होता, जो 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करू शकतो. याशिवाय, iQoo चा आगामी स्मार्टफोन, म्हणजेच iQoo 10 Pro 200W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येणार आहे, जो फोन 12 मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकतो. जर तुम्हाला फोन चार्ज करण्यासाठी 12 मिनिटेही घालवायची नसतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जून : स्मार्टफोन (Smartphone) ही आता काळाची गरज झाली आहे. स्मार्टफोनच्या बाबतीत सतत नवनवीन संशोधन पुढं येत आहे. स्मार्टफोनचं चार्जिंग तंत्रज्ञानही (Smartphone Charging Technology) गेल्या काही वर्षांत झपाट्याने सुधारले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, Xiaomi ने Xiaomi 11i हायपरचार्ज सादर केला होता, जो 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करू शकतो. याशिवाय, iQoo चा आगामी स्मार्टफोन, म्हणजेच iQoo 10 Pro 200W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येणार आहे, जो फोन 12 मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकतो. जर तुम्हाला फोन चार्ज करण्यासाठी 12 मिनिटेही घालवायची नसतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एक चीनी कंपनी (OEM) 240W चार्जिंग तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे. Oppo आणू शकते हे तंत्रज्ञान- डिजिटल चॅट स्टेशनच्या अहवालानुसार एक चीनी OEM 24Volts/10Amp चार्जरचे ट्रायल प्रोडक्शन करत आहे. हा चार्जर 240W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यास सक्षम असेल. या फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानावर नक्की कोणती चीनी कंपनी काम करत आहे, हे टिपस्टरने शेअर केले नसले तरी, अहवालात असे सूचित होते की ही कंपनी Oppo असू शकते. हेही वाचा- Vivo च्या सर्वांत स्लिम 5G स्मार्टफोन, पहिल्यांदाच मिळतोय 5500 रुपयांनी स्वस्त 9 मिनिटांत बॅटरी पूर्ण चार्ज होते- Oppo ने फेब्रुवारीमध्ये एका कार्यक्रमात 240W सुपरवूक फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाची माहिती दिली होती. त्या माध्यमातून 4500mAh क्षमतेची बॅटरी फक्त 9 मिनिटांत चार्ज होऊ शकते. कंपनीने या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी स्मार्टफोनवर कधी येणार हे जाहीर केलेले नाही. पंरतु एका अहवालात असं सांगण्यात आलंय की या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन लवकरच बाजारात येऊ शकतात. हा दावा खरा आहे मानल्यास, Oppo कडून पुढील-जनरल प्रीमियम स्मार्टफोनच्या  X-सिरीज स्मार्टफोनपैकी एक स्मार्टफोन 240W जलद चार्जिंग तंत्रज्ञानासह येऊ शकतो, ज्यामुळे फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामध्ये आणखी सुधारणा आहे. हेही वाचा- Best Budget Phone: 10 हजारांपेक्षाही स्वस्तात मिळणार 48 MP, 4 कॅमेऱ्याचा फोन या ब्रॅण्डकडे आहेत फास्ट चार्जिंग- यापूर्वी Xiaomi कंपनीने Xiaomi 11i Hypercharge 5G आणि iQoo कंपनीने iQoo 9 Pro 5G युजर्सना 120W जलद चार्जिंग तंत्रज्ञान दिलं आहे. याशिवाय Realme GT Neo 3 स्मार्टफोनमध्ये 80W जलद चार्जिंग तंत्रज्ञान दिलं गेलं आहे. त्यामाध्यमातून केवळ 12 मिनिटांत फोन पूर्णपणे चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. अलीकडेच Vivo ने Vivo X80 मालिकेतील फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले. टॉप-एंड Vivo X80 Pro मध्ये 4700mAh बॅटरी आहे जी 80W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. लॅपटॉप, टॅब्लेटमध्ये येऊ शकते तंत्रज्ञान- जलद चार्जिंग तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. हे तंत्रज्ञान सध्या प्रामुख्याने स्मार्टफोन्सपुरते मर्यादित असले तरी येत्या काही वर्षांत ते लॅपटॉप, टॅब्लेट आणि बॅटरीवर चालणाऱ्या इतर डिव्हाईसपर्यंत पोहोचू शकते.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Oppo smartphone, Smartphones, Technology

    पुढील बातम्या