फ्लिपकार्टच्या सेल संपण्यास आता काही तास उरले आहेत. हा सेल 27 जूनला संपणार आहे. तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा असेल तर हा सेल उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुमचा जुना फोन बदलण्याची संधी देखील आहे. या सेलमध्ये प्रसिध्द ब्रँडचे मोबाईल फोन स्वस्तात खरेदी करता येतात. मायक्रोमॅक्स IN नोट 1 सुध्दा स्वस्तात उपलब्ध आहे.
फ्लिपकार्टच्या रिपोर्टनुसार Micromax In Note 1 हा मोबाईल 9,999 मध्ये मिळेल. याची मूळ किंमत 15,499 एवढी आहे. या मोबाईलमध्ये Helio G85 प्रोसेसर आणि 48 मेगापिक्सल क्वाड कॅमेरा आहे.
यात 6.67 इंचाचा IPD LCD डिस्प्ले फुल HD+ रेझोल्यूशनसोबत देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G85 पेक्षा कमी आहे. या नवीन फोनमध्ये अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या दोन वर्षात अँड्रॉईड 11 ते 12 हे दोन्ही अपडेट येतील. हा फोन हिरव्या तर पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.
क्वॉड कॅमेरा सेटअप : यात AI क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेसंर मिळेल. याशिवाय यात 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड, 2 मेगापिक्सेलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेसंर मिळेल. सेल्फी काढण्यासाठी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला 5000 mah ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याला 18w ची फास्ट चार्जिंगही आहे.