Home /News /technology /

Vivo च्या सर्वांत स्लिम 5G स्मार्टफोन, पहिल्यांदाच मिळतोय 5500 रुपयांनी स्वस्त

Vivo च्या सर्वांत स्लिम 5G स्मार्टफोन, पहिल्यांदाच मिळतोय 5500 रुपयांनी स्वस्त

या सेलमधून ग्राहकांना Vivo T1 5G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

या सेलमधून ग्राहकांना Vivo T1 5G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

या सेलमधून ग्राहकांना Vivo T1 5G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे.

    मुंबई, २५ जून : फिल्५पकार्टवर सध्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सेल (Flipkart Electronic Sale) सुरू आहे. त्या सेलमधून ग्राहक स्मार्टफोन्सवर सर्वोत्तम डील्स (Best Deals), तसंच डिस्काउंट ऑफर्सचा (Disount Offers) लाभ मिळवू शकतात. ग्राहकांसाठी हा सेल म्हणजे मोबाइल ऑफरच्या सुपरस्टोअरसारखा आहे. त्यात नो कॉस्ट EMI, एक्स्चेंजवर बेस्ट डील्स, कम्प्लीट मोबाइल प्रोटेक्शन आदी सुविधा त्यात उपलब्ध आहेत. तुम्ही आतापर्यंत या सेलमधून काही खरेदी केली नसलं, तर तातडीने विचार करा. 27 जून 2022 हा या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमधून ग्राहकांना Vivo T1 5G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी उपलब्ध आहे. या फोनवर मिळणाऱ्या डीलचं वर्णन Offer Like Never before म्हणजेच अशी ऑफर पूर्वी कधीच मिळाली नव्हती, असं करण्यात आलं आहे. हा सर्वांत स्वस्त 5 जी फोन आहे. 19,990 रुपये किमतीचा हा फोन या सेलमध्ये फक्त 14,490 रुपयांना खरेदी करता येणार आहे. Vivo T1 5G या स्मार्टफोनला 6.58-इंच आकाराचा IPS FHD+ डिस्प्ले आहे. 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2.5D कर्व्ह्ड एज ही त्याची वैशिष्ट्यं आहेत. हा स्मार्टफोन 2.2GHz क्वालकॉम Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो. त्याचा AnTuTu स्कोर 4,00,000+ एवढा आहे. Vivo T1 5G या स्मार्टफोनमध्ये 5-लेअर टर्बो लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. Vivo T1 5G च्या खास फीचर्सबद्दल बोलायचं झालं, तर यात स्नॅपड्रॅगन 695 5G चिपसेट आहे. 120Hz एवढा रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपदेखील या फोनमध्ये आहे. हा फोन तीन स्टोरेज व्हॅरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत. 4GB RAM आणि 128GB स्टोरेज, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज, तसंच 8GB RAM आणि 128GB स्टोरेज हे टॉप एंड व्हर्जन अशी या फोनची तीन व्हॅरिएंट्स उपलब्ध आहेत. फनटच OS 12.0 आउट-ऑफ-द-बॉक्स हेदेखील या फोनचं वैशिष्ट्य आहे. Vivo T1 5G या फोनमध्ये ट्रिपल लेन्स कॅमेरा आहे. त्यात 50 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सल सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही फोनमध्ये आहे. पॉवरसाठी या फोनला 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये USB Type-C, 2.5/ 5GHz वायफाय, ब्लूटूथ 5.1 आणि ड्युएल नॅनो SIM देण्यात आलं आहे. या फोनचं वजन केवळ 187 ग्रॅम्स आहे. व्हिवोचा हा सर्वांत स्लिम स्मार्टफोन आहे.
    First published:

    पुढील बातम्या