फोनचं चार्जिंग लवकर संपतं? बॅटरी वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

फोनचं चार्जिंग लवकर संपतं? बॅटरी वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर काही खास ट्रिक वापरून चार्जिंग जास्तवेळ टिकवू शकता.

  • Share this:

मुंबई, 17 मार्च : स्मार्टफोन हा दररोजच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. एखाद्यावेळी फोन विसरला किंवा चार्जिंग संपल्यावर मोठी समस्या निर्माण झाल्यासारखं वाटतं. जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर काही खास ट्रिक वापरून चार्जिंग जास्तवेळ टिकवू शकता. यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील.

मोबाइल वापरताना सेटिंगमध्ये गरजेनुसार अनेक बदल करत असतो. कधी ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस ऑन करतो. काम संपल्यानंतरही ते तसंच सुरु राहतं. ते बंद केल्यास बॅटरीचा वापर कमी होईल.

सेटिंगप्रमाणे अशी अनेक अॅप्स असतात जी आपण बंद न करता तसंच बॅक बटन मारतो. त्यावेळी अॅप्स बॅकग्राउंडला सुरुच असतात. यामुळे बॅटरीचा वापर होत असतो. असा वापर कमी व्हावा यासाठी बॅकग्राउंड अॅप्स वेळोवेळी क्लिअर करा.

तुमच्या फोनची स्क्रीन कीती वेळ ऑन असते त्यावरही बॅटरीची क्षमता अवलंबून असते. जर बॅटरी वाचवायची असेल तर स्क्रीन डिस्प्लेसाठी टायमर सेट करा. त्यामुळे ठराविक वेळेत तुम्ही स्क्रीनवर टॅप नाही केलंत तर स्क्रीन बंद होईल. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन डिस्प्ले सेटिंग ओपन करा. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले पर्याय टर्न ऑफ करा. त्यानंतर तुम्हाला काही सेकंद ते मिनिट असा पर्यायही मिळेल त्यानुसार डिस्प्ले किती वेळेत बंद व्हावा ते सेट करता येतं.

हे वाचा : 96 तास तुमच्या मोबाईलवर जिवंत राहू शकतो कोरोना व्हायरस! असा करा फोन साफ

फोनच्या बॅटरी सेव्हिंगसाठी तुम्हाला अनेक पर्याय असतात. त्यामध्ये डार्क मोड वापरून बॅटरी सेव्ह करता येईल. यामुळे तुमच्या डोळ्यांवर येणारा ताणही कमी होईल. जी अॅप्स या फीचर्सला सपोर्ट करतात त्यात डार्क मोड अनेबल होईल. याशिवाय बॅटरी सेव्हर असाही पर्याय असतो. फोन वापरात नसेल तेव्हा बॅटरी सेव्हर ऑन केल्यास फायदा होतो.

हे वाचा : तुमचं Facebook Account दुसरं कोणी वापरत नाही ना? असं करा चेक

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Mar 17, 2020 07:43 AM IST

ताज्या बातम्या