जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / दिवाळीपूर्वी देशात लाँच होणार जिओ 5G, पहिल्या टप्प्यात मुंबईचाही समावेश, मुकेश अंबानींची घोषणा

दिवाळीपूर्वी देशात लाँच होणार जिओ 5G, पहिल्या टप्प्यात मुंबईचाही समावेश, मुकेश अंबानींची घोषणा

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, दिवाळीपूर्वी 5G नेटवर्कही होणार सुरु : मुकेश अंबानी

जिओ फायबरचं भारतात 11 लाख किमीचं जाळं, दिवाळीपूर्वी 5G नेटवर्कही होणार सुरु : मुकेश अंबानी

Jio 5G launch Date- रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या सभेदरम्यान रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा केली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून देशात 5G सेवेचा शुभारंभ कधी होणार याची चर्चा सुरु आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करण्यास सज्ज आहेत. त्यामुळं आज होणाऱ्या रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण  सभेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. या सभेदरम्यान रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा केली.  पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5 G सेवा सुरु होणार आहे.  मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लाँच होणार आहे. रिलायन्स जिओ अत्यंत अत्याधुनिक स्टँड अलोन 5G च्या माध्यमातून सेवा देणार आहे. रिलायन्स सेवा हे खऱ्या अर्थानं 5G आहे.  रिलायन्स समूहाची सर्वसाधारण वार्षिक बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात 5G सेवा सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली अशा महानगरांसह काही मोठ्या शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरु केली जाणार आहे. डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील प्रत्येक शहर, तालुक्यापर्यंत जिओ 5G पोहोचणार आहे.

    • जिओने दिवाळी 2022 पर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. डिसेंबर 2023 पर्यंत 18 महिन्यांत संपूर्ण भारत कव्हर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने इतर शहरे आणि शहरांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल. Jio ची महत्त्वाकांक्षी 5G रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान असेल.
    • संपूर्ण भारत ट्रू-5G नेटवर्क तयार करण्यासाठी, जिओने एकूण 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
    • जिओने स्वदेशीरित्या एंड-टू-एंड 5G स्टॅक विकसित केला आहे
    • Jio 5G हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत 5G नेटवर्क असेल.

    हेही वाचा:  रिलायन्सचा रोजगार निर्मितीत नवा विक्रम, मुकेश अंबानी यांची Reliance 45th AGM मध्ये माहिती

     रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले की, रिलायन्सने रोजगार निर्मितीत नवा विक्रम केला आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये 2.32 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. रिलायन्स रिटेल आता भारतातील सर्वात मोठी नोकरी निर्माण करणारी कंपनी आहे.

    Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात