मुंबई, 19 एप्रिल: फ्लिपकार्ट (Flipkart) वर स्मार्टफोन कार्निवल सेल सुरू आहे. हा सेल स्मार्टफोनसाठी ठेवण्यात आला आहे. जेथे नागरिकांना स्वस्तात स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करता येणार आहे. या सेलचा शेवटचा दिवस 20 एप्रिल असून या सेलमध्ये बजेट फोनपासून ते प्रीमियम फोनपर्यंत सर्वांवर बेस्ट डील उपलब्ध करण्यात येत आहे. या सेलमध्ये 5000mAh बॅटरी असलेला जिओनी मॅक्स (Gionee Max) स्मार्टफोन खूपच स्वस्त दरात मिळत आहे. या स्मार्टफोनची खास बाब म्हणजे याची दमदार बॅटरी आणि HD+ डिस्प्ले आहे.
या सेलमध्ये Gionee Max हा स्मार्टफोन 4,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 इतकी होती आणि आता हा फोन 5 हजारांहून कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये...
Gionee Max फोनचे फीचर्स
Gionee Max या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी+ (1560x720 पिक्सल) कर्व्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 1.6 गिगाहर्ट्झ Unisoc SC9863A प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी IMG8322 GPU आहे. फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला असून हा स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 256GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. जिओनीचा हा स्वस्त स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 10वर चालतो.
वाचा : अवघ्या 22 हजारांत खरेदी करा Voltas AC, उन्हाळा करा कूल..कूल...
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनला 4G VoLTE, Wi-Fi 802.11 बी/जी/एन, ब्ल्यूटूथ 4.2, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र, या फोनमध्ये अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेले नाहीये.
दमदार कॅमेरा
जिओनी मॅक्स फोनमध्ये LED फ्लॅशसह 13 MPचा प्रायमरी सेंसरसह डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावरसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. खास बाब म्हणजे एन्ट्री लेवलचा हा फोन रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येतो. म्हणजेच दुसऱ्या फोनच्या माध्यमातून तुम्ही हा फोन चार्ज करु शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Discount offer, Flipkart, Sale, Smartphone