मुंबई, 16 एप्रिल: सध्या उन्हाळ्याचा (Summer) कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हाळ्यामुळे हैराण झालेले लोक आपआपल्या पद्धतीने त्यावर उपाय शोधत आहेत. टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्रे, सोशल मीडिया सगळीकडे उन्हाची झळ कमी करण्यासाठी पंखे, कूलर आणि एसीच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे होणारी तलखी दूर करून थंड हवेत झोपण्याचे सुख अनुभवण्यासाठी अनेकजण एअर कंडिशनर (Air conditioner) घेण्याचा विचार करत आहेत. अनेकदा एसीची किंमत जास्त असल्यानं अनेकांना आपलं हे स्वप्न दूरच ठेवावं लागतं; पण आता व्होल्टासनं (Voltas) तुमचा उन्हाळा थंड करण्यासाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. त्यामुळे अवघ्या 22 हजार 690 रुपयांमध्ये एसी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. बाजारपेठेत 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या विंडो (Window) आणि स्प्लिट एसीच्या (Split AC) श्रेणीत व्होल्टासनं आपल्या उत्पादनावर 43 टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. व्होल्टास 1.5 टन विंडो एसी**:** व्होल्टासचा हा शक्तिशाली एसी थ्री स्टार रेटिंगसह येतो. या एसीमध्ये R-32 गॅसचा वापर करण्यात आला आहे. ऑटो रिस्टार्ट, स्लीप मोड, इको मोड, टर्बो कूलिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा उपयोग केला आहे. कंपनी या एसीवर 1 वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी आणि 4 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देत आहे. या किमतीवर 19 टक्के सवलत देण्यात आली असून, फ्लिपकार्टवर 24 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. वाचा : तुम्ही कोणासोबत आणि किती वेळ बोलता? व्हॉटसअॅपमधील या त्रुटीमुळे हॅकर्स करताहेत हेरगिरी व्होल्टास 0.75 टन विंडो एसी (102EZQ-R410A): व्होल्टासच्या या एसीला 2 स्टार रेटिंग असून, यात ऑटो रिस्टार्ट, स्लीप मोड, इन्स्टंट कूलिंग फंक्शन, टायमर, स्लीप मोड आणि ई-सेव्हर मोड यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या एसीवर कंपनी 1 वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी आणि 4 वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी देते. या एसीवर 7 टक्के सवलत असून, तो फ्लिपकार्टवरून 19 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. व्होल्टास 1 टन 3 स्टार विंडो एसी (123LZF / 123LZF): थ्रीस्टार रेटिंग असणाऱ्या या एसीमध्ये आर-22 गॅसचा वापर करण्यात आला आहे. यातही ऑटो रिस्टार्ट, इन्स्टंट कूलिंग, ई-सेव्हर मोड आणि स्लीप मोडही वैशिष्ट्ये असून, यावरही एक वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी आणि 4 वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी आहे. यावर 13 टक्के सवलत असून, 21 हजार 990 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून याची खरेदी करता येईल. व्होल्टास 0.8 **टन स्प्लिट एसी (103 **डीझेडएक्स (आर32) / 103****डीझेडएक्स): व्होल्टासच्या या थ्रीस्टार स्प्लिट एसीमध्ये स्लीप मोड, ऑटो रिस्टार्ट, थ्रीडी फ्लो, 4 स्टेज फिल्ट्रेशन सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यावरही 1 वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी आणि 5 वर्षाची कॉम्प्रेसर वॉरंटी आहे. या एसीवर व्होल्टासनं सर्वाधिक 43 टक्के सवलत दिली असून, फ्लिपकार्टवर हा एसी 22 हजार 690 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.