मुंबई, 27 जुलै: नवीन फोन घेतल्यानंतर सुरुवातीला त्याची बॅटरी चांगला परफॉरमन्स (Smartphone battery performance) देते. मात्र काही महिन्यांनंतर किंवा वर्षानंतर हा परफॉर्मन्स कमी होतो. तुमच्यापैकी अनेकांना असा अनुभव आला असेल. तुमच्या फोनची बॅटरीही आता आधीसारखी टिकत नसेल, तर तुम्हाला फोनच्या बॅटरीची स्थिती (Check Battery status) तपासण्याची गरज आहे. काही ब्रँड्स आपल्या फोनमध्येच बॅटरी लाईफ तपासण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात; तर काही स्मार्टफोनमध्ये आपल्याला यासाठी थर्ड-पार्टी अॅपची (Apps to diagnose smartphone battery) गरज भासते. आपल्या फोनची बॅटरी कशी तपासता येईल? तसंच बॅटरीचं आयुष्य वाढवण्यासाठी (Improve smartphone battery life) काय करता येईल, या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अशा प्रकारे तपासा बॅटरी-
आपल्याला मोबाईलचा बॅटरी बॅकअप कमी होत आलेला सहज जाणवतो. मात्र, तरीही आपल्या फोनची बॅटरी तपासण्यासाठी थर्ड पार्टी अॅप वापरणं फायद्याचं ठरू शकतं. अॅक्यु-बॅटरी (AccuBattery App) हे असंच एक अॅप आहे. तुमच्या फोनची बॅटरी ठीक आहे का, चार्जिंग स्पीड काय आहे, चार्जिंग होत असताना फोनचं तापमान किती वाढतं, फोन किती व्होल्टनं चार्ज होतो आहे, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती (AccuBattery App features) तुम्हाला या अॅपमधून मिळते. अर्थात, या गोष्टी दररोज तपासण्याची गरज नसते. मात्र वेळोवेळी या गोष्टी तपासून तुम्ही तुमच्या फोनच्या बॅटरीचे आयुष्य नक्कीच वाढवू शकता.
सॅमसंगच्या फोनमध्ये आपल्या फोनची बॅटरी तपासण्याचा पर्याय (Samsung Battery diagnose option) दिलेला असतो. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी अँड डिव्हाईस केअर हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर डायग्नोस्टिक या पर्यायावर टॅप करून पुढे बॅटरी स्टेटस हा पर्याय निवडावं लागेल. सॅमसंग अशाच प्रकारे इतर अॅप्सचा परफॉरमन्स तपासण्याचाही पर्याय देतं. अशाचप्रकारे वन प्लस फोन वापरणाऱ्यांसाठी फोनमध्ये आधीपासून पर्याय उपलब्ध नसला, तरी वनप्लसचं स्वतःचं ‘वनप्लस केअर’ हे अॅप (OnePlus Care app features) उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला फोनमधील अॅप्स आणि बॅटरीची चाचणी करुन त्याचं स्टेटस सांगितलं जातं.
****हेही वाचा:**** वीज बिलाच्या खर्चाच्या कटकटीतून कायमचं मुक्त व्हा! सोलर पॅनल बसवा, सरकारही करेल मदत
इतर कंपन्यांपैकी शाओमी कंपनी ही आपल्या फोनमध्ये केवळ तापमान तपासण्याचा पर्याय देते. रिअलमी कंपनी तर अशा कोणत्याच प्रकारची सुविधा आपल्या फोनमध्ये देत नाही. इतर स्मार्टफोनसाठी वर दिलेला थर्ड पार्टी अॅपचा पर्याय योग्य ठरतो. अॅक्यु बॅटरी अॅप हे दहा मिलियनहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे, तसेच या अॅपमध्ये जाहिराती देखील नाहीत.
असं वाढवा बॅटरीचं आयुष्य
1. बॅटरी ड्रेनिंग अॅप्स बंद करणं-
तुमच्या फोनमधील कित्येक अॅप्स बॅकग्राउंडला सुरू राहून तुमच्या फोनचे चार्जिंग संपवत असतात. कोणत्या अॅपसाठी किती बॅटरी वापरली जाते हे तपासण्यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन बॅटरी या पर्यायावर टॅप करू शकता. याठिकाणी तुम्हाला कोणते अॅप किती चार्जिंग वापरत आहे हे कळू शकले. तुम्हाला गरज नसणारे अॅप (Battery Draining apps) तुम्ही बंद करून, त्याच्यामार्फत कंझ्यूम होणारी बॅटरी वाचवू (How to increase battery life) शकता. यामुळे तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप वाढण्यास मदत होईल.
2. जीपीएस बंद करणे, ब्राईटनेस कमी करणे
फोनची जीपीएस सेवा बंद करणे, ऑटो ब्राईटनेस सुरू करणे तसेच स्क्रीनचा रिफ्रेश रेट हा 60 Hz ठेवणे, ऑटो स्क्रीन ऑफ टाईम 30 सेकंद ठेवणे असे विविध पर्याय वापरून तुम्ही बॅटरी बॅकअप वाढवू शकता. सोबतच, लोकेशन सर्व्हिस बंद करणे, गरज नसल्यास डिस्प्ले बंद ठेवणे, डार्क मोड वापरणे, गरज नसलेले फीचर्स बंद ठेवणे असेही बरेच पर्याय (How to lower the battery usage in smartphone) तुम्ही वापरू शकता.
3. 100 टक्के चार्जिंग नकोच
अॅक्यु-बॅटरी अॅपने दिलेल्या माहितीनुसार, कोणताही स्मार्टफोन हा कधीही 100 टक्के चार्ज (Charging smartphone to 100 percent may harm the battery) करू नये. यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीला नुकसान पोहोचण्याची शक्यता वाढते. अॅपल कंपनीही याबाबत सारखाच सल्ला देते. तसेच, सॅमसंग देखील आपला स्मार्टफोन 85 टक्क्यांपर्यंतच चार्ज करण्याचा सल्ला देते. तसेच, अॅक्यु-बॅटरी अॅप तुमच्या फोनचे तापमान 50 डिग्री सेल्सियसच्या वर जाऊ देऊ नका असा सल्लाही देते.
बॅटरी खराब झाल्यानंतर काय करावे?
स्मार्टफोनची बॅटरी खराब झाल्यानंतर ती बदलणे (Smartphone battery replacement) हा एकमेव चांगला पर्याय आहे. शाओमीने नुकतीच बॅटरी रिप्लेसमेंट मोहीम घोषित केली आहे. यामध्ये ग्राहकांना केवळ 499 रुपयांमध्ये आपल्या स्मार्टफोनची बॅटरी बदलून दिली जात आहे. ही ऑफर शाओमी आणि रेडमी या दोन्ही स्मार्टफोनवर (Xiaomi and Redmi battery replacement) आहे. मात्र, बॅटरीची किंमत स्मार्टफोनच्या मॉडेलनुसार बदलू शकते. इतर स्मार्टफोन ब्रँडच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, त्याबाबत तुम्हाला संबंधित कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल.
Tags : Smartphone Battery, Battery saving tips, Battery replacement, Smartphone Battery draining apps
सुदेश