मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वीज बिलाच्या खर्चाच्या कटकटीतून कायमचं मुक्त व्हा! सोलर पॅनल बसवा, सरकारही करेल मदत

वीज बिलाच्या खर्चाच्या कटकटीतून कायमचं मुक्त व्हा! सोलर पॅनल बसवा, सरकारही करेल मदत

रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल.

रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल.

रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल.

    मुंबई, 27 जुलै : वाढत्या महागाईमुळे कुठे पैशांची बचत होईल का याकडे लोक लक्ष देत आहेत. घरातील वीजेच्या बिलावरही मोठा खर्च होत असतो. अनेकदा वीजेच्या अतिवापरामुळे बिलात भरमसाठ वाढ होते. त्यामुळे घरखर्चाचं बजेटही वाढतं. याशिवाय वीज खंडित होण्याचीही समस्या असतेच. मात्र ग्रीन एनर्जीच्या मदतीने तुम्ही वीज कपात आणि महागड्या बिलांपासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावावे लागेल. यासाठी सरकारकडूनही मदत मिळेल. तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यापूर्वी तुम्हाला किती वीज लागते याची माहिती घ्या. तुमच्या घरातील विजेवर चालणारी कोणती उपकरणे आहेत? याचा अंदाज घ्या. त्यानुसार तुम्ही सोलर पॅनल बसवू शकता. दररोज 6 ते 8 युनिट विजेसाठी, तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 2 kW सौर पॅनेल लावू शकता. यामध्ये तुम्हाला चार सोलर पॅनल मिळतील. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सोलर पॅनेल आहेत. यामध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागातून वीज निर्माण होते. अशा प्रकारे तुम्हाला दररोज लागणारी वीज मिळेल. भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय सोलर रूफ टॉप योजना चालवत आहे. डिस्कॉमच्या पॅनेलमध्ये सामील असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून कोणीही त्याच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावू शकतो. यानंतर सबसिडीसाठी अर्ज करता येईल. जर तुम्ही ते डिस्कॉममधील विक्रेत्याकडून सेटअप करून घेतला, तर ते पाच वर्षांसाठी रूफटॉप सोलरच्या मेंटनन्ससाठी देखील जबाबदार असतील. Water Plant Business : फक्त 5 लाख गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, पहिल्या दिवसापासून होईल मोठी कमाई सबसिडी किती मिळते? रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सौर रूफटॉप पॅनेल बसवल्यास, सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंतचे सोलर पॅनल लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल. स्थानिक वीज वितरण कंपनी डिस्कॉम ही योजना राज्यांमध्ये चालवत आहे. किती खर्च येईल? समजा तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर 2 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले आहे, तर त्याची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असेल. मात्र यावर तुम्हाला सरकारकडून 40 टक्के सबसिडी मिळेल. अशा परिस्थितीत तुमचा खर्च 72 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल आणि तुम्हाला सरकारकडून ४८,००० रुपयांची सबसिडी मिळेल. सोलर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे असते. अशा परिस्थितीत, एकदाच एवढी गुंतवणूक करून तुम्ही दीर्घ कालावधीसाठी महागड्या विजेपासून मुक्त होऊ शकता. ATM मधून पैसे काढताना तुमची कधीच फसवणूक होणार नाही, SBI ने दिली महत्त्वपूर्ण माहिती कुठे कराल अर्ज? सौर रूफटॉप बसवण्यासाठी, तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ वर जावं लागेल. येथे तुम्ही राज्यानुसार लिंक निवडा. त्यानंतर फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्ही तुमचे सर्व तपशील भरा. सोलर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे प्रदान केलेल्या तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Electricity bill, Money

    पुढील बातम्या