Home /News /technology /

15 हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्ट TV येणार घरी; HDR, गुगल असिस्टंट आणि बरंच काही...

15 हजारांपेक्षा कमी किंमतीत स्मार्ट TV येणार घरी; HDR, गुगल असिस्टंट आणि बरंच काही...

विशेष म्हणजे हे स्मार्ट टीव्ही(Smart TV) अगदी सर्वसामान्य व्यक्तीला देखील परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहेत.

    सध्याचा जमाना हा इंटरनेटचा (Internet) आहे. स्वस्तात आणि सर्वत्र मिळणाऱ्या इंटरनेटमुळे सगळं जगच ऑनलाइन झालं आहे. कोरोनाच्या साथीमुळे (Corona Pandemic) वर्क फ्रॉम होम (Work from Home) ही संस्कृती चांगलीच रुजली आहे. त्याचबरोबर मनोरंजनासाठी (Entertainment) ओटीटी (OTT) म्हणजे ऑनलाइन मनोरंजन करणाऱ्या अ‍ॅप्सची (Apps) चलती झाली आहे. तरुण पिढी बराच वेळ मोबाइलवर घालवत असल्यानं इंटरनेटच्या सहायानं अ‍ॅप्सच्या माध्यमातून चालणाऱ्या ओटीटी कंटेंटची मागणी वाढली आहे. आता हा ओटीटीवरील कंटेंट पाहण्यासाठी स्मार्ट टीव्हीही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळं सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मोठ्या स्क्रीनवर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट बघणं शक्य झालं आहे. विशेष म्हणजे हे स्मार्ट टीव्ही(Smart TV) अगदी सर्वसामान्य व्यक्तीला देखील परवडतील अशा किमतीत उपलब्ध आहेत. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ओटीटी अॅप, गूगल असिस्टंट(Google Assistant), वायफाय (Wi Fi) आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट (Built In Chromecast) इत्यादी वैशिष्ट्यांनी सुसज्ज असे हे स्मार्ट टीव्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्यामुळे नेटफ्लिक्स (Netflix), डिस्ने हॉट स्टार (Disney Hot Star) अशा अनेक ओटीटी अ‍ॅप्सवरील कंटेंट टीव्हीवर पाहता येणार आहे. हे ही वाचा-नवं फीचर!आता WhatsAppवर बिनधास्त पाठवा HD Photo,क्वॉलिटी खराब होण्याचं नो टेन्शन इन्फिनिक्स एक्स 1 (Infinix X1): इन्फिनिक्सचा 32 इंचाचा हा स्मार्ट टीव्ही ईपीआयसी 2.0 पिक्चर इंजिन(EPIC 2.0 picture engine) आणि एचडीआर सपोर्टसह येतो. यामध्ये गूगल असिस्टंट, इन-बिल्ट क्रोमकास्ट, वाय-फाय, यूएसबी आणि एचडीएमआय पोर्ट आदी वैशिष्ट्य असून, त्याची किंमत फक्त 14 हजार 999 रुपये आहे. टीसीएलचा आयएफएलसीओएन (iFFALCON by TCL) : टीसीएल(TCL) कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्टसह उपलब्ध आहे. यामुळे युजर्स नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि यूट्यूब आदी विविध ओटीटी अ‍ॅप्सचा आनंद घेऊ शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी, या टीव्हीमध्ये एचडीएमआय(HDMI) आणि यूएसबी पोर्ट(USB Port) आहेत. तसंच या टीव्हीमध्ये डॉल्बी साऊंड सपोर्टसह दोन स्पीकर्स आहेत. त्यामुळे चित्रपटगृहात बसून चित्रपट बघितल्याचा अनुभव घेता येणार आहे. या टीव्हीची किंमतदेखील 14 हजार 999 रुपये आहे. एमआय 4ए प्रो (Mi 4A PRO) : एमआयच्या(Mi) या 32 इंचाचा डिस्प्ले असलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट आहे. हा स्मार्ट टीव्ही 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेजसह येतो. यामध्ये दोन स्पीकर्स आणि एचडीएमआय पोर्टदेखील आहे. तसंच या टीव्हीवर नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि यूट्यूबसारखे अनेक ओटीटी अ‍ॅप्सही उपलब्ध आहेत. अशा या एमआयच्या स्मार्ट टीव्हीची किंमतदेखील फक्त 14 हजार 999 रुपये आहे.
    First published:

    Tags: Techonology, Tv

    पुढील बातम्या