मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone मधून फोटो काढताना येतायेत अडचणी? वाचा या सोप्या Tips,नक्की ठरतील उपयोगी !

Smartphone मधून फोटो काढताना येतायेत अडचणी? वाचा या सोप्या Tips,नक्की ठरतील उपयोगी !

स्मार्टफोनद्वारे उत्तम फोटोग्राफी (Best Photography Tips) करण्याच्या काही टिप्स

स्मार्टफोनद्वारे उत्तम फोटोग्राफी (Best Photography Tips) करण्याच्या काही टिप्स

स्मार्टफोनद्वारे उत्तम फोटोग्राफी (Best Photography Tips) करण्याच्या काही टिप्स

मुंबई, 23 ऑगस्ट: फोटोग्राफी (Photography) या कलेचा शोध लागला, तेव्हापासून फोटो हा माणसाच्या आवडीचा विषय आहे. तेव्हापासून आजच्या स्मार्टफोनच्या युगापर्यंत फोटोग्राफीत तांत्रिकदृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. फोटो उत्तम टिपला जायला हवा असेल, तर सर्वांत महत्त्वाची असते ती फोटोग्राफरची कल्पनाशक्ती आणि त्याची दृष्टी. अर्थातच तांत्रिक गोष्टीही उत्तम असाव्याच लागतात. सुदैवाने आज आपण अशा युगात आहोत, की जिथे कॅमेरा आपल्या प्रत्येकाच्या हातात म्हणजेच स्मार्टफोनमध्ये येऊन बसला आहे. तसंच, स्मार्टफोनमध्येही (Smartphone Photography) इतकी क्रांती झाली आहे, की त्यातल्या कॅमेऱ्याची/लेन्सेसची क्वालिटी अत्यंत उत्तम असते. तसंच, किमान तीन ते जास्तीत जास्त पाच कॅमेरेही एका फोनला असू शकतात. सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे फोटो क्वालिटी उत्तम असते. बहुतांश फोन्सना फ्रंट कॅमेराही चांगल्या दर्जाचा असतो. त्यामुळे स्मार्टफोन हातात असलेल्या प्रत्येक फोटोग्राफरला आपलं कौशल्य पणाला लावून उपलब्ध तंत्राचा उत्तम प्रकारे वापर करून घ्यायचा असतो. फोटोग्राफरच्या दृष्टीला उत्तम तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर उत्तम फोटो टिपला जातो, यात काही शंकाच नाही. स्मार्टफोनद्वारे उत्तम फोटोग्राफी (Best Photography Tips) करण्याच्या काही टिप्स 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केल्या आहेत.

- एखाद्या विशिष्ट वस्तूचा किंवा घटकाचा फोटो टिपायचा असेल, तर पोर्ट्रेट मोडचा (Portrait Mode) वापर करावा. तुमचा पाळीव कुत्रा किंवा मांजर, एखादं सुंदर फूल किंवा बागेतली गोगलगाय अशा कोणत्या घटकाचा फोटो टिपायचा असेल, तर पोर्ट्रेट कॅमेरा मोड (Portrait Camera Mode) उपयुक्त ठरतो. त्यामुळे तो घटक हायलाइट केला जातो आणि त्याचा बॅकग्राउंड ब्लर (Blurr Background) होतो. त्यामुळे साहजिकच ज्या वस्तूचा किंवा घटकाचा फोटो टिपायचा आहे, ती वस्तू फोटोत उठून दिसते. अलीकडे बहुतेकशा कंपन्यांच्या स्मार्टफोन्समध्ये फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये पोर्ट्रेट मोड दिलेला असतो. त्यातून येणारे फोटो उत्तम दर्जाचे असतात.

या फोनची स्क्रिन तुटली तर भरावे लागतील 36000 रुपये, या फोनमध्ये इतकं आहे तरी काय?

- एक्स्पोजर हा फोटो टिपण्यातला सर्वांत महत्त्वाचा घटक असतो, हे तुम्हाला माहिती असेलच. स्मार्टफोनवरून फोटो काढताना एक्स्पोजर बॅलन्स करण्यासाठी स्क्रीनवरच्या सर्वांत प्रकाशित (Bright) भागावर टॅप करावं. त्यामुळे एक्स्पोजर बॅलन्स (Exposure Balance) चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते आणि फोटो चांगला येतो.

- घराबाहेर फोटो काढताना अर्थात Outdoor Photography करताना योग्य प्रकाशात फोटो येण्यासाठी सूर्यप्रकाश तुमच्या पाठीमागून येत असल्याची खात्री करावी. लेन्सच्या समोर अर्थात कॅमेराच्या समोर सूर्यप्रकाश येऊ नये. हेच तत्त्व घरात किंवा Indoor Photography करतानाही वापरावं. प्रकाशाचा जो काही स्रोत असेल, तो फोटोग्राफरच्या पाठीमागे असला पाहिजे. तसं असेल, तर फोटो चांगला टिपला जातो.

- अपोझिट बॅकग्राउंडचा (Opposite Background) वापर केला, तर फोटो चांगला येतो आणि अधिक आकर्षक दिसतो. फोटोग्राफी करताना चांगला बॅकग्राउंड उपलब्ध नसेल, तर निळ्या आकाशाचा बॅकग्राउंड म्हणून वापर करावा. त्यामुळे फोटोत थ्रीडी इफेक्ट मिळतो.

Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Google नेही केलं बॅन; आतापर्यंत 4500 युजर्सला मोठा आर्थिक फटका

 -सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोनवरून फोटो टिपण्यापूर्वी किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यापूर्वी लेन्स पुसून (Cleaning of Camera Lens) घेणं आवश्यक आहे. स्मार्टफोन सतत हाताळला जात असल्यामुळे फोनच्या कॅमेरा लेन्सवर तेलाचा थर जमा होतो. त्यामुळे फोटोत एक प्रकारचा थर दिसतो. लेन्स पुसण्यासाठी शर्ट किंवा टी-शर्टचा उपयोग करू नये. एका स्वच्छ कापडाच्या साह्याने लेन्स पुसून घ्यावी आणि मगच फोटोग्राफी करावी.

या काही साध्याच, पण महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेतल्यात, तर तुम्ही स्मार्टफोनवरून अधिक स्मार्ट फोटोज टिपू शकाल.

First published:
top videos

    Tags: Photography, Smartphone