रामकुमार नायक/01 मार्च : मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यासाठी तुम्हाला चार्जिंगची गरज पडते. बऱ्याचदा घाईघाईत निघतो आणि आपल्या मोबाईल, लॅपटॉपची बॅटरीही लो असते. त्यामुळे मध्येच ते बंद पडतात. पण आता काळजी करायची गरज नाही. कारण चार्जिंग नसलं तरी बाहेर चालता चालताच तुम्ही तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही चार्ज करू शकता. काय आश्चर्य वाटलं ना? हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. छत्तीसगढमधील तीन विद्यार्थिनींनी ही कमाल केली आहे. अकरावीच्या या विद्यार्थिनींनी असे हायटेक शूझ तयार केले आहेत, ज्यामुळे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज होईल. हे शूझ तुमचं लोकेशन ट्रॅग करू शकतील. पिथौरातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील या तीन विद्यार्थिनी. अरे बापरे! मोबाईल पाहताच येते चक्कर आणि उलटी; महिलेला झाला असा विचित्र आजार तिघींनी संस्कार शिक्षण संस्थानच्या मदतीने हे खास शूझ तयार केले आहेत. संस्थेतील तरुण वैज्ञानिक गौरव चंद्राकार म्हणाले, हे हायटेक शूझ घालून पायी चालताना मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करता येईल. या शूझमध्ये असं सिस्टम बसवण्यात आलं आहे की धोक्याच्यावेळी हाय वोल्टेज झटका देऊन बचावही करेल. यामध्ये जीपीआरएस सिस्टमही आहे. म्हणजे आपात्कालीन परिस्थितीत हे शूझ पोलीस आणि कुटुंबातील सदस्यांना मेसेजही पाठवेल.
मेघा सिन्हा, अलिफा भोई आणि प्रीती चौहान असं या विद्यार्थिनींचं नाव आहे. हे शूझ जवान आणि महिलांच्या सुरक्षेत मदतशीर ठरतील, असं या तिघी म्हणाल्या. व्हिडीओ इथं पाहा.
आता सरकार लवकरच हे शूझ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ज्याची किंमत फक्त 1500 रुपये असेल असं सांगितलं जातं आहे. या आविष्काराचं कौतुक केलं जातं आहे.