मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे बापरे! मोबाईल पाहताच येते चक्कर आणि उलटी; महिलेला झाला असा विचित्र आजार

अरे बापरे! मोबाईल पाहताच येते चक्कर आणि उलटी; महिलेला झाला असा विचित्र आजार

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

दिवसातील 14 तास मोबाईल वापरणाऱ्या एका महिलेची अवस्था भयंकर झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 28 फेब्रुवारी : मोबाईलचे आरोग्यावर बरेच परिणाम होतात. डोळे खराब होतात, झोपेच्या समस्या निर्माण होतात याशिवाय आणखी इतर काही आजारही बळावतात. पण मोबाईलमुळे तुम्ही कधी चक्कर आणि उलटी झाल्याचं ऐकलं आहे का? कित्येक तास मोबाईल वापरणाऱ्या एका महिलेला असा विचित्र आजार झाला आहे. मोबाईलमुळे तिची इतकी भयंकर अवस्था झाली आहे की तुम्ही विचारही केला नसेल.

पोर्तुगालमधील हे प्रकरण आहे. फेनेला फॉक्स असं महिलेचं नाव आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. 29 वर्षांची फेनेला  तिला मोबाईलचं इतकं व्यसन होतं की दिवसभरातील 14 तास ती मोबाईलवर असायची. त्यानंतर तिला काही समस्या जाणवू लागली. ती म्हणाली, 2021 सालच्या सुरुवातीला तिच्या डोक्यात आणि मानेत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर चक्कर येऊ लागली, उलट्या येणंही सुरू झालं. तिला नीट चालताही येत नव्हतं.

'हा मला चावला, माझ्यावर उपचार करा'; रुग्णालयात असं काही घेऊन आली महिला, डॉक्टरांनाही धक्का

आपल्याला नेमकं काय झालं आहे जाणून घेण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली पण डॉक्टरांनाही तिच्या आजाराचं निदान करता आलं नाही. जेव्हा तिची तब्येत खूप बिघडली. तेव्हा तिनं ब्रिटनमध्ये आपल्या आईवडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

ती म्हणाली, एअरपोर्टवर पोहोचल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला समस्या इतकी वाढली की मला व्हिलचेअरची मदत घ्यावी लागली. ब्रिटनमधील डॉक्टरांनाही समजलं नाही की तिला नक्की काय झालं आहे.

मोबाईलने फेनेलाला अक्षरशः अपंग करून ठेवलं. फेनेलाच्या वडिलांनी एकदा सायबर सिकनेसबाबत वाचलं. आपल्या मुलीमधील लक्षणं पाहून ती सायबर सिकनेसची शिकार झाल्याचं त्यांना समजलं. तिला डिजिटल व्हर्टिगो झाला होता.

स्मार्टफोन्समुळे डोळ्यांवर परिणाम होतोय का? टेन्शन नको; अशी घ्या काळजी

दुर्दैवाने फेनेला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पैसे कमवते. इन्स्टाग्रामशिवाय ती अडल्ट वेबसाईटसाठीही काम करते. जिथून तिची महिन्याला 15 हजार डॉलरपेक्षा जास्त कमाई होते. ती सांगते, आता ती आपला फोन पुन्हा पुन्हा पाहत नाही, कारण यामुळे तिचे सायबर सिकनेसची लक्षणं पुन्हा दिसू लागतात.

फेनेलाची जी अवस्था झाली ती तुमचीही होऊ शकते. त्यामुळे मोबाईल वापरताना जरा जपूनच. नाहीतर तुम्हीसुद्धा या विचित्र आजाराचे शिकार व्हाल.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Mobile, Smartphone