• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Tesla च्या सेल्फ ड्रायव्हिंग कार लाँचला ब्रेक; चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

Tesla च्या सेल्फ ड्रायव्हिंग कार लाँचला ब्रेक; चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

टेस्लाच्या चाहत्यांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. टेस्ला यावर्षी महत्त्वाकांक्षी सेल्फ ड्रायव्हिंग कार दाखल करेल अशी अपेक्षा होती. पण आता टेस्लाच्या या कारच्या लाँचला ब्रेक लागला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 9 मे: सध्या जगभरात टेस्लाच्या (Tesla) सेल्फ ड्रायव्हिंग कारची (Self Driving Car) प्रतीक्षा आहे. पण टेस्लाच्या चाहत्यांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. टेस्ला यावर्षी महत्त्वाकांक्षी सेल्फ ड्रायव्हिंग कार दाखल करेल अशी अपेक्षा होती. पण आता टेस्लाच्या या कारच्या लाँचला ब्रेक लागला आहे. कंपनीनं कॅलिफोर्नियाच्या नियामकांना (California Regulator) सांगितलं आहे की, कंपनीचं सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञान या वर्षाच्या अखेरीस येऊ शकत नाही. त्यामुळं कॅलिफोर्निया विभागातील मोटार वाहन (DVM) विभागानं याबाबत एक मेमोही दिला आहे. भारतातही टेस्लाच्या आगमनाची उत्सुकतेनं प्रतीक्षा केली जात असून कंपनीनं आपला उत्पादन प्रकल्पही भारतात उभारण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात हा प्रकल्प असून कंपनीचं महत्त्वाचं केंद्र बंगळूरू इथं आहे. लवकरच मुंबईत कंपनीचं भारतातील पहिलं शोरूमही सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक आणि सेल्फ ड्रायव्हिंग असं अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या टेस्लानं वाहन क्षेत्रात क्रांती घडवली आहे. बदलत्या काळानुरूप पर्यावरणपूरक कार्सना मागणी वाढणार आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी जानेवारीत झालेल्या एका परिषदेत यावर्षाच्या अखेरीस सेल्फ ड्रायव्हिंग कार दाखल होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.

(वाचा - नवी कार खरेदी करताय? Maruti Suzuki च्या 'या' कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट)

यामुळे होतोय विलंब - टेस्ला ऑक्टोबरपासून आपले काही ग्राहक आणि कर्मचारी यांच्यासह फुल सेल्फ ड्रायव्हिंग (FSD) प्रोग्रामच्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे. टेस्ला सध्या कामाच्या दुसऱ्या पातळीवर आहे. कॅलिफोर्निया विभागातील मोटार वाहन (डीव्हीएम) विभागानं 9 मार्च रोजी ऑटोप्लेचे इंजिनीअर सीजे मूर (CJ Moor) यांच्यासह टेस्ला प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत असं सांगितलं की, दुसरी पातळी ही सेमी-ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टिमशी संबंधित असून यामध्ये मानवी ड्रायव्हरची देखरेख आवश्यक आहे.

(वाचा - मुंबईत या ठिकाणी उभं राहणार Tesla चं भारतातील पहिलं शोरूम)

या पार्श्वभूमीवर कंपनीला देण्यात आलेला मेमो लीगल ट्रांन्सपरन्सी ग्रुप प्लेन साईटद्वारे माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत (FOIA) प्रसिद्ध करण्यात आला आहे. लेव्हल 5 मधील क्षमता सुधारण्याबाबत काम सुरू असून, या वर्षाच्या अखेरीस हे पूर्ण होऊ शकेल का याबाबत आताच काही सांगू शकत नसल्याचं टेस्लानं म्हटलं आहे.

(वाचा - कारमधून कचरा नदीत फेकणं पडलं भारी; VIDEO व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कठोर कारवाई)

20 पेक्षा अधिक टेस्ला कार्सच्या अपघातांची तपासणी सुरू - कॅलिफोर्नियातील फोंटानाजवळ नुकताच एका टेस्ला कारचा अपघात (Accident) झाला आणि त्यात टेस्ला चालकाचा मृत्यू झाला. त्यावेळी ही टेस्ला कार ऑटोपायलट मोडवर होती का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यासह टेस्ला वाहनांशी संबधित 20 पेक्षा जास्त अपघातांचा कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलिंग विभागातर्फे तपास करण्यात येत आहे.
First published: