नवी दिल्ली, 8 मे : खास आणि वैशिष्टपूर्ण फीचर्ससह, आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारे मॉडेल्स हे मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीचं वैशिष्ट मानलं जातं. या कंपनीच्या चार चाकी गाड्यांना सातत्याने मागणी असते. परंतु, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सध्या गाडी खरेदीकडे कल कमी आहे. परंतु, अशा स्थितीतही लोकांचा ओढा या कंपनीच्या विविध मॉडेल्सकडे कायम आहे.
भारतातील मारुती सुझुकी कंपनीच्या निवडक डिलर्सकडून विविध मॉडेल्सवर भरघोस सवलत देण्यात येत आहे. ही सवलत मारुती सुझुकीच्या नेक्सा (Nexa) आणि अरेना (Arena) या मॉडेलवर एक्सचेंज बोनस (Exchange Bonus), कॉर्पोरेट डिस्काऊंट (Corporate Discount) आणि रोख रक्कमेत सूट (Cash Discount) या माध्यमातून मिळणार आहे.
नेक्सा (Nexa) -
मारुती सुझुकी इग्निस (Ignis) या फीचर्स मॉडेलवर 15,000 रुपयांचा एक्चेंज बोनस, 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस, तर रोख डिस्काऊंट 12,500 रुपये दिला जात आहे. द बॅलिनो (The Baleno) या गाडीवर 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस 10,000 रुपये, तर रोख डिस्काऊंट 12,500 रुपये आहे.
नेक्सा डिलरशीप चेन मारुती सुझुकी एस-क्रॉस मॉडेलवर 15,000 रुपये रोख डिस्काऊंट, 5000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनस 15,000 रुपये दिला जाणार आहे. प्रिमियम सियाझची (Ciaz) विक्री 5000 रुपये एक्सचेंज बोनस, 10,000 रुपये रोख डिस्काऊंट आणि 5000 रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंटसह केली जात आहे. सियाझचा द एक्सएल 6 (Ciaz XL6) या व्हेरिएंट वर केवळ 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे.
अॅरिना (Arena) -
मारुती सुझुकीच्या हॅचबॅक स्वीफ्टच्या (Swift) सर्व मॉडेल्सवर 20,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपये रोख डिस्काऊंट दिला जात आहे. मारुती सुझुकीच्या वॅगन आर (Wagon R) या मॉडेलवर एक्सचेंज बोनस 15,000 रुपये, रोख डिस्काऊंट 8,000 रुपये उपलब्ध आहे. सीएनजी मॉडेलवर (CNG Models) 5000 रुपयांचा अधिक रोख डिस्काऊंट दिला जात आहे.
carwale.com च्या वृत्तानुसार, एंट्री लेव्हल इको मॉडेलवर 15,000 वर एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपये रोख डिस्काऊंट देण्यात येत आहे. द एल एक्स आय ट्रिम (The LXI Trim) हॅचबॅक या मॉडेलवर अतिरिक्त 20,000 रुपये रोख डिस्काऊंट दिला जात आहे. ZXI+ आणि ZXI या लोकप्रिय Vitara Brezza व्हेरिएंटवर 20,000 रुपयांचा रोख डिस्काउंट आहे. तसंच या मॉडेलच्या VXI आणि LXI व्हर्जन्सवर 10,000 रुपयांची सवलत दिली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.