मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! WhatsApp वर या Scam मुळं होऊ शकतं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी

सावधान! WhatsApp वर या Scam मुळं होऊ शकतं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Friend In Need नावाच्या Scam ची फार (cyber crime whatsapp number) चर्चा होत असून त्यामुळं युजर्सला आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढलेली आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Friend In Need नावाच्या Scam ची फार (cyber crime whatsapp number) चर्चा होत असून त्यामुळं युजर्सला आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढलेली आहे.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Friend In Need नावाच्या Scam ची फार (cyber crime whatsapp number) चर्चा होत असून त्यामुळं युजर्सला आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढलेली आहे.

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : सध्या धावपळीच्या काळात सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यातच मेसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅप दिवसेंदिवस प्रसिद्ध होत आहे. त्यावर आता युजर्ससाठी ऑनलाईन पेमेंट्सचीही सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळं त्याचा वापर करत असताना युजर्सला सायबर (scam on whatsapp) क्राइम पासून बचाव करण्यासाठी विविध गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर Friend In Need नावाच्या Scam ची फार (cyber crime whatsapp number) चर्चा होत असून त्यामुळं युजर्सला आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढलेली आहे.

काय आहे Friend In Need?

Friend In Need च्या प्रकरणांमध्ये युजर्सला विविध नंबर्सवरून आर्थिक अडचणीत आहे, पैशांची गरज आहे, विदेशात (how to track a scammer on whatsapp) अडकलोय अशा आशयाचे काही मेसेजेल ठगांकडून पाठवण्यात येतात. त्यामुळं अनेकदा युजर्स अशा भुलथापांना बळीदेखील पडतात.

36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

अशी होते फसवणूक

UK मध्ये National Trading Standards ने दिलेल्या रिपोर्टनुसार आतापर्यंत किमान 59 टक्के लोकांना अशा पद्धतीच्या फसवणूकीला सामोरं जावं लागलं आहे. त्याचं स्पष्टीकरण स्वत: व्हॉट्सअ‍ॅपने दिलं आहे. अशा प्रकरणांतून बचावासाठी व्हॉट्सअ‍ॅप सतर्कता बाळगण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.  National Trading Standards चे लुइस बॅक्सटर यांचं म्हणणं आहे की अश्या मेसेजेसमधून स्कॅमर हे युजर्सला मित्र किंवा नातेवाईक असल्याचं भासवतात. त्यामाध्यमातून ते युजर्सची गोपनीय माहिती विचारतात व त्यातून आर्थिक फसवणूक केली जाते.

लॉन्च होणार Samsung चा जबरदस्त 5G Smartphone, कमी किमतीत मिळतील कमाल फीचर्स

कसे येतात हे मेसेज?

युजर्सचं अकाउंट हॅक केल्यानंतर स्कॅमर युजर्सला त्यांची ओळख असलेल्या लोकांद्वारे मेसेजेस करतात. त्यामुळं युजर्सला ते आपल्याच जवळच्या व्यक्तीला गरज आहे असा विश्वास निर्माण होतो. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. परंतु तोपर्यंत फार वेळ झालेला असतो.

आता Two Wheelers मध्ये मिळणार Airbag चं फीचर, अपघातावेळी सेकंदात होईल सुरक्षा

त्यामुळं असा फसव्या आणि बनावट मेसेजेसला बळी पडू नका. जर कोणत्याही जवळच्या व्यक्तीने पैसे मागितले तर त्याला फोन करून खरंच गरज आहे की नाही याची खात्री करा. त्याचबरोबर कुणालाही अकाउंटसंबंधीत खाजगी माहिती शेयर करू नका.

First published:
top videos

    Tags: Online fraud, Online payments, Online security, Whatsapp pay