इंटरनेट डेटा लगेच संपतोय का? मोबाइलवर वापरा या ट्रिक्स

इंटरनेट डेटा लगेच संपतोय का? मोबाइलवर वापरा या ट्रिक्स

LockDown मुळे घरी असलेल्या लोकांचा बराच वेळ ऑनलाइन जातो. त्यामुळे डेली डेटा लवकर संपल्यानंतर पुन्हा इंटरनेट वापरण्यात अडचणी येतात.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : कोरोनाला रोखण्यासाठी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. त्यानंतर आता अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घातले आहेत. यामुळे सर्वच जण आता घरात बंदिस्त झाले आहेत. स्मार्टफोन असल्यानं timepass करायला एक चांगला पर्याय आहे. मात्र हा स्मार्टफोनची इंटरनेट असेपर्यंत. सध्या टेलिकम्युनिकेशन कंपन्या जास्तीजास्त 3 जीबी डेली डेटा देतात. मात्र सोशल मीडिया, व्हिडिओ, online webseries पाहताना हा डेटा संपून जातो. त्यानंतर डेटा पॅक मारावा लागतो किंवा दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागते. मात्र काही ट्रिक्स आहेत त्यामुळे दिवसभर वापरला जाणारा अनावश्यक डेटा आपण वाचवू शकतो.

डेटा वाचवण्यासाठी प्रत्येक मोबाइलला डेटा सेव्हिंग मोड आहे. त्यामध्ये ठराविक डेटा लिमिट सेट करता येते. त्यामुळे सेट केलेले डेटा लिमिट संपल्यानंतर नोटिफिकेशन येतं. तेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापर करून उरलेला डेटा वापरता येतो.

याशिवाय अनेक अप्स आहेत ज्यात जास्त डेटा जातो. फेसबुक, फेसबुक मेसेंजर, ट्विटर, whatsapp, युट्युबचा सर्वाधिक वापर होतो.

फेसबूक आणि फेसबुक मेसेंजरला फेसबुक lite हे अँप पर्याय ठरू शकते. यातून फेसबुकसह मेसेजही करता येतात. तसंच डेटासुद्धा कमी जातो. फेसबुकप्रमाणे ट्विटरच lite अँप आहे. ते वापरल्याने इंटरनेट डेटा कमी लागतो.

हे वाचा : Work From Home : इंटरनेट Disconnect होत असेल तर ऑफलाइन मोड सेटअपचा असा करा वापर

व्हॉट्सअपवर media auto Download हा पर्याय असतो. मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ केल्याने आपल्याला पाहिजे असतील तेवढेच फोटो, व्हिडिओ डाउनलोड करता येतात. यामुळे अनावश्यक मीडिया डाउनलोड होणार नाही आणि डेटा कमी use होईल. याशिवाय लो डेटा असाही एक पर्याय सेटिंगमध्ये असतो.

युट्युब किंवा ऑनलाईन विडिओ streaming साठी सर्वाधिक इंटरनेट वापरले जाते. ऑनलाईन विडिओ पाहताना तुमच्या रेंजनुसार त्याची quality दिसत असते. High resolution चे व्हिडिओमुळे जास्त डेटा खर्च होतो. ते टाळण्यासाठी कमी resolution सेट करून विडिओ पाहू शकता.

हे वाचा : Coronavirus : इंटरनेटवर या गोष्टी शोधणं धोकादायक, काळजी घ्या

YouTube video डाउनलोड करून पाहिल्यास जाहिरातीसाठी जाणारा वेळ आणि डेटा वाचेल. तुम्ही असे सेव्ह केलेले व्हिडीओ वायफायवरून डाउनलोड करून घेऊन नंतर पाहू शकता. यामुळे डेटा संपणार नाही.

तुमचा डेली डेटा संपल्यानंतर इंटरनेट वापरण्यासाठी कंपन्या फक्त डेटा पॅकची ऑफर देतात. असा रिचार्ज केल्यास डेली डेटा संपल्यानंतर डेटा पॅकचे इंटरनेट सुरू राहते.

हे वाचा : LockDown मुळे घरी बसलेल्या लोकांसाठी... VIDEO Streaming साठी आता कमी डेटा लागणार

First published: March 27, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या