Home /News /technology /

Coronavirus : इंटरनेटवर या गोष्टी शोधणं धोकादायक, काळजी घ्या

Coronavirus : इंटरनेटवर या गोष्टी शोधणं धोकादायक, काळजी घ्या

सध्या कोरोनाबद्दल योग्य माहितीऐवजी अफवाच जास्त पसरत चालल्या असून अशी माहिती ऑनलाइन शोधणं धोक्याचं ठरू शकतं.

    मुंबई, 23 मार्च : कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता भारतातही वाढू लागली आहे. त्यामुळे अनेकजण आता कोरोनाबद्दलची माहिती ऑनलाइन शोधत आहेत. सध्या कोरोनाबद्दल योग्य माहितीऐवजी अफवाच जास्त पसरत चालल्या असून अशी माहिती ऑनलाइन शोधणं धोक्याचं ठरू शकतं. या परिस्थितीचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे कोरोना संबंधित पुढील काही गोष्टी सर्च करणं टाळा किंवा काळजी घ्या. सध्या तरी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अधिकृत अॅप नाही. दरम्यान, सायबर हल्ला करणाऱ्यांनी CovidLock असा एक रॅन्समवेअर तयार केला आहे. त्यामुळं अशा अॅपपासून सावध रहा. अशा अॅपमधून तुमचा फोन हॅक करून ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यात येतात. कोरोना व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील देशांमधील सरकारची अधिकृत वेबसाइटवरून मिहिती दिली जाते. त्यासाठी खास अशी वेबसाइट नाही ज्यावर विश्वास ठेवता येईल. दरम्यान, इंटरनेटवर कोरोना व्हायरसशी संबंधित वेबसाइटस आहेत. यावरून बँकिंगसह खाजगी माहितीची चोरी केली जाते.  त्यामुळं अशा वेबसाइटवर जाणं टाळा. ऑनलाइन कोरोना टेस्टिंग किट धोकादायक कोरोना झाल्याचं निदान कऱणं ही एक कठीण प्रक्रिया आहे. यासाठी बराच काळ लागतो. अनेक रुग्णांना चाचणी केल्याशिवाय कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट होत नाही. त्यामुळं घरच्या घरी टेस्ट किट मागवणं धोकादायक आहे. कोरोना व्हायरसचं निदान करण्यासाठीचं किट ऑनलाइन दाखवतं मात्र त्यातून लोकांना मूर्ख बनवलं जात आहे. अशा प्रकारचं कोणतंही अधिकृत टेस्टिंग किट सरकारने ऑनलाइन उपलब्ध केलेलं नाही. कोरोनाच्या लक्षणांची अधिकृत माहिती WHO कडे कोरोनाच्या लक्षणांची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती कोणत्याही इतर वेबसाइट किंवा अॅपवर नाही. ते सर्व बनावट आहे. तुम्हाला जर लक्षणांबद्दल खात्री नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनावर औषधं नाहीत कोरोना व्हायरसवर अजुनही कोणतेही औषधोपचार नाहीत. त्यामुळं त्यावर ऑनलाइन औषधं शोधू नका. ऑनलाइन येणाऱ्या उपचाराच्या आणि औषधांच्या ऑफरकडे दुर्लक्ष करा. फिशिंग मेल जागतिक आरोग्य संघटनेनं सर्व इंटरनेट युजर्सना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांना फिशिंग मेल पाठवले जात असून त्यातून डेटा चोरी केली जात असल्याचं म्हटलं आहे. अज्ञातांकडून आलेले मेल्स आणि लिंक ओपन करू नका. कोरोनाबाबत खोटी माहिती देणारे व्हिडिओ गुगलने नुकतंच कोरोनाशी संबंधित खोटी माहिती पसरवणारे व्हिडिओ काढून टाकले आहेत. कोरोनावर ऑनलाइन उपचाराबाबत कोणतीही माहिती किंवा व्हिडिओ शोधण्याच्या फंदात पडू नका हे वाचा : Coronavirus पासून वाचण्यासाठी एकच सुरक्षित जागा, NASA ने दिली माहिती कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती कशी वाढवायची? कोरोनावर उपचाराबद्दलच नाही तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा अनेकजण व्हिडिओ बघत आहेत. यापेक्षा सरकारने दिलेल्या गाइडलाइन्सचे पालन करणं सर्वात चांगला पर्याय आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ सर्च करणं टाळा. प्रतिकारशक्ती अचानक वाढवता येत नाही. त्यासाठी काही काळ लागतो. कोरोनाग्रस्तांना मदतीसाठी चॅरिटींचे ऑनलाइन जाळे जगभरात अनेक देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. या परिस्थितीत अनेकांनी ऑनलाइन चॅरिटी सुरू केली असून कोरोनाग्रस्तांना मदत करत असल्याचा दावा केला जात आहे. पण अशा चॅरिटीपासूनही तुम्ही दूर रहा. कोणतेही डोनेशन देण्यापूर्वी संबंधित संस्था, वेबसाइटबद्दल खात्रीशीर माहिती घ्या आणि त्यानंतरच डोनेशन द्या. हे वाचा : Work From Home : इंटरनेट Disconnect होत असेल तर ऑफलाइन मोड सेटअपचा असा करा वापर
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या