मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भारीच की! सॅमसंगच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार तब्बल 20 वर्षांची वॉरंटी, वाचा सविस्तर

भारीच की! सॅमसंगच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार तब्बल 20 वर्षांची वॉरंटी, वाचा सविस्तर

भारीच की! सॅमसंगच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार तब्बल 20 वर्षांची वॉरंटी, वाचा सविस्तर

भारीच की! सॅमसंगच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार तब्बल 20 वर्षांची वॉरंटी, वाचा सविस्तर

Samsung Warranty: सॅमसंग कंपनी ही टेक मार्केटमधील आपली जागा मजबूत करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेत असते. इतर ब्रँड्स अशा ऑफर देत नाही. स्मार्टफोनवरील अँड्रॉइड अपडेट्सबाबत असो किंवा इतर प्रॉडक्ट्सवरील वॉरंटी असो, सॅमसंगने आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 डिसेंबर: सॅमसंग हा टेक प्रॉडक्ट्स बनवणारा जगातला मोठा ब्रँड आहे. सॅमसंग स्मार्टफोनपासून टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनपर्यंत अनेक प्रॉडक्ट्स बनवते. जगभरात या कंपनीच्या प्रॉडक्ट्सच्या युजर्सची संख्या मोठी आहे. ही कंपनी दक्षिण कोरियाची आहे. कंपनीचे भारतीय बाजारपेठेत जवळपास दीड लाख आऊटलेट्स आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना चांगल्या सोईसुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी ते नवीन प्रॉडक्ट्स आणि प्रॉडक्ट्समधील अपडेटही आणत असते.

तसंच सॅमसंग कंपनी ही टेक मार्केटमधील आपली जागा मजबूत करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेत असते. इतर ब्रँड्स अशा ऑफर देत नाही. स्मार्टफोनवरील अँड्रॉइड अपडेट्सबाबत असो किंवा इतर प्रॉडक्ट्सवरील वॉरंटी असो, सॅमसंगने आतापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कंपनी इतर कोणत्याही ब्रँडच्या तुलनेत आपल्या स्मार्टफोनवर अधिक अँड्रॉइड अपडेट्स देत असते. सॅमसंगने आता वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर्ससाठीही अशीच एक मोठी घोषणा केली आहे. या डिव्हायसेसना चार किंवा पाच वर्षांपर्यंत अपडेट मिळणार नाहीत. उलट, त्यावर अनेक वर्षं वॉरंटी मिळेल. त्याचे डिटेल्स जाणून घेऊयात.

हेही वाचा: अपघातवेळी 'या' वस्तूंमुळे वाचू शकतो जीव; समजून घ्या सविस्तर

सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठ्या कंझ्युमर ब्रँडपैकी एक आहे. कंपनी वॉशिंग मशीनच्या डिजिटल इन्व्हर्टर मोटर आणि रेफ्रिजरेटरच्या डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर 20 वर्षांची वॉरंटी देत आहे. म्हणजेच ही प्रॉडक्ट्स खरेदी केल्यानंतर, तुम्हाला ती खराब होण्याचं टेन्शन 20 वर्षांपर्यंत राहणार नाही. कंपनीने अधिकृतपणे ही माहिती दिली आहे.

कंपनीनं काय म्हटलंय?

कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांची मोठी चिंता दूर होईल, असं ब्रँडचं म्हणणं आहे. त्यांना प्रॉडक्ट्सची ड्युरेबिलिटी आणि रिलायबिलिटीबद्दल फार टेन्शन येणार नाही. तसेच यामुळे ई-वेस्टही कमी होईल. खरं तर सॅमसंग प्रॉडक्ट्समध्ये डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत. यामुळे विजेचा खर्च कमी होतो आणि प्रॉडक्ट्सची लाइफ वाढते.

सॅमसंगच्या वॉशिंग मशिनमध्ये वापरलेली डिजिटल इन्व्हर्टर मोटर मजबूत मॅग्नेटसह येते. यामुळे फ्रिक्शन कमी होते. यामुळे तुम्हाला कपडे धुण्याचा शांत आणि स्मूद अनुभव तर मिळेलच, पण तुमचे बजेटही खराब होणार नाही. तर डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वेगवेगळ्या स्पीडवर काम करते. त्याउलट स्टँडर्ड सिंगल स्पीड कॉम्प्रेसर एकतर बंद राहतात किंवा पूर्ण स्पीडने काम करतात.

सॅमसंग कंपनीचे हे नवीन अपडेट्स ग्राहकांसाठी खूप फायद्याचे ठरतील.

First published:

Tags: Samsung