मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

अपघातवेळी 'या' वस्तूंमुळे वाचू शकतो जीव; समजून घ्या सविस्तर

अपघातवेळी 'या' वस्तूंमुळे वाचू शकतो जीव; समजून घ्या सविस्तर

अपघातवेळी 'या' वस्तूंमुळे वाचू शकतो जीव; समजून घ्या सविस्तर

अपघातवेळी 'या' वस्तूंमुळे वाचू शकतो जीव; समजून घ्या सविस्तर

अपघातात लॉक झालेल्या कारमधून बाहेर कसं पडायचं हे जाणून घेण्यापूर्वी कार लॉक का होते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अपघातानंतर कारला आग लागली, की त्यातल्या बहुतांश इलेक्ट्रिक पार्ट्समध्ये शॉर्ट सर्किट होतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 डिसेंबर: रोड सेफ्टी अर्थात रस्ते सुरक्षितता हा मुद्दा नेहमीच सार्वजनिक आरोग्याच्या चर्चेतला मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्त्यांवरच्या अपघातांत होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरण पावतात. या अपघातांमध्ये कारसारख्या चारचाकी वाहनांची संख्यादेखील मोठी आहे. कार अपघातानंतर गाडीला आग लागते आणि त्या आगीत प्रवासी जळून खाक झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. अपघातानंतर कारचा दरवाजा उघडत नाही. त्यामुळे त्यातल्या प्रवाशांचा गुदमरून मृत्यू होतो. अनेकदा अपघात झाल्यानंतर सेंट्रल लॉक अडकतं किंवा ते नीट काम करत नाही. परिणामी आतल्या प्रवाशांना वेळेत गाडीच्या बाहेर पडता येत नाही. काही टिप्स लक्षात ठेवल्या तर लॉक असलेल्या गाडीतूनही बाहेर पडता येऊ शकतं.

अपघातात लॉक झालेल्या कारमधून बाहेर कसं पडायचं हे जाणून घेण्यापूर्वी कार लॉक का होते, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अपघातानंतर कारला आग लागली, की त्यातल्या बहुतांश इलेक्ट्रिक पार्ट्समध्ये शॉर्ट सर्किट होतं. असं झाल्यास सर्वांत आधी कारच्या पॉवर विंडो, सीट बेल्ट आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टीम काम करणं थांबवतं आणि व्यक्ती कारमध्ये अडकून राहते. अशा स्थितीत आगीत होरपळून जीव गेला नाही तरी केबिनमध्ये पसरलेला कार्बन मोनोऑक्साइडमुळे प्रवाशाचा जीव जातो. त्यामुळे कारमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, तर त्यातल्या प्रवाशांचे प्राण वाचू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

हेही वाचा: सावधान! तुमचं प्रायव्हेट चॅट कुणी वाचत नाही ना? 2 मिनिटांत करा चेक

कारमध्ये असाव्यात 'या' वस्तू

1.सीट बेल्ट कटर : सेंट्रल लॉकिंग सिस्टीम बंद झाल्यानंतर सीट बेल्टदेखील लॉक होतो. अशा परिस्थितीत, आपल्याकडे सीट बेल्ट कटर असल्यास, आपण बेल्ट कापून सहजपणे बाहेर पडू शकता. सीट बेल्ट कटर नसेल, तर कात्री किंवा ब्लेड सारख्या वस्तू कारमध्ये ठेवल्या पाहिजेत.

2.अग्निशामक सिलिंडर : कारला आग लागल्यास, अग्निशामक यंत्र आपल्याला आग विझविण्यास मदत करू शकतं. त्यामुळे गाडीत नेहमी लहान अग्निशामक सिलिंडर ठेवा.

3. हातोडा : अपघाताच्या वेळी कारमध्ये हातोडा असल्यास त्याचा नक्की उपयोग होईल. लॉक झालेल्या कारच्या काचा फोडण्यात हातोडा कामी येईल. परिणामी जीवही वाचेल.

4. विंडो ग्लास ब्रेकर : अपघातानंतर अनेक वेळा कारचे दरवाजेही बंद होतात. अशा स्थितीत विंडो ग्लास ब्रेकरच्या मदतीनं काचा फोडून बाहेर पडता येईल.

या काही वस्तू कारमध्ये कायम ठेवल्या पाहिजेत. त्यांच्या मदतीनं जीव वाचवता येऊ शकतो.

First published:

Tags: Accident, Car, Toolkit case