जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / पुढील वर्षापासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर प्रीमियम स्मार्टफोन? हे आहे कारण

पुढील वर्षापासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर प्रीमियम स्मार्टफोन? हे आहे कारण

पुढील वर्षापासून खरेदी करता येणार नाही Samsung चा हा पॉप्युलर प्रीमियम स्मार्टफोन? हे आहे कारण

सॅमसंगने पहिल्यांदा नोट 2011 मध्ये लाँच केला होता. जो मोठ्या स्क्रिन मॉडेलच्या रुपात बाजारात जबरदस्त पॉप्युलर झाला होता. या फोनने अॅपललाही मागे टाकत, सॅमसंगला त्या वर्षात पहिल्यांदा जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी होण्यास मदत केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : साउथ कोरियन टेक्नोलॉजी कंपनी सॅमसंग (Samsung) आपली पॉप्युलर, प्रीमियम फोन गॅलेक्सी नोट (Galaxy Note) सीरीज बंद करू शकत असल्याची शक्यता आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला असून यामागचं कारणंही देण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, कोरोनामुळे हाय-एंड स्मार्टफोनच्या मागणीत घसरण झाल्याने कंपनी हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार, सॅमसंग पुढच्या वर्षात बाजारात आपल्या S सीरीजअंतर्गत एक नवा स्मार्टफोन Galaxy S21 लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनमध्ये युजर्सला S pen सपोर्ट मिळू शकतो.

(वाचा -  1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस )

रिसर्च फर्म काउंटरपॉइंटचे एनालिस्ट टॉम कांगने सांगितलं की, सॅमसंग नोट सीरीजची विक्री यावर्षी 80 टक्क्यांवरून घसरून 6 मिलियन होण्याची शक्यता आहे. तर S-सीरीजची विक्री 5 मिलियनने घसरून 30 मिलियनहून खाली येण्याचा अंदाज आहे. यावर्षात प्रीमियम फोनच्या मागणीत घसरण झाली असून अनेक ग्राहक नव्या प्रोडक्डच्या शोधात असल्याचं ते म्हणाले.

(वाचा -  iPhone वॉटरप्रूफ असल्याचं सांगणं Apple कंपनीला पडलं महागात;लागला 88 कोटींचा दंड )

सॅमसंगने पहिल्यांदा नोट 2011 मध्ये लाँच केला होता. जो मोठ्या स्क्रिन मॉडेलच्या रुपात बाजारात जबरदस्त पॉप्युलर झाला होता. या फोनने अॅपललाही मागे टाकत, सॅमसंगला त्या वर्षात पहिल्यांदा जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी होण्यास मदत केली होती.

(वाचा -  आजच जाणून घ्या कार, बाईकसंबंधी नवे 5 नियम; अन्यथा रद्द होईल ड्रायव्हिंग लायसन्स )

गॅलेक्सी, Z Flip होणार? मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग फोल्डेबल Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन लाँच करणार असल्याची माहिती होती. Galaxy Note सीरीजच्या टॉप वेरिएंटची किंमत Galaxy Fold सोबत क्लॅश होण्याची शक्यता आहे. त्यामुळेही कंपनी हा फोन पुढे लाँच न करण्याचा निर्णय घेऊ शकते. Galaxy Z Flip 3 फोनला 6.9 इंची 120Hz फोल्डेबल डिस्प्ले असू शकतो. सॅमसंगने मागील वर्षी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात