मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

1 सप्टेंबरला लॉन्च होणार Samsungचा फोल्डेबल फोन, असे आहेत धमाकेदार फिचर्स

1 सप्टेंबरला लॉन्च होणार Samsungचा फोल्डेबल फोन, असे आहेत धमाकेदार फिचर्स

सॅमसंग आता आपला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2 बाजारात आणणार आहे.

सॅमसंग आता आपला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2 बाजारात आणणार आहे.

सॅमसंग आता आपला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2 बाजारात आणणार आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : स्मार्टफोन बनवणारी टॉपची कंपनी Samsung आता मार्केटमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याच्या तयारीत आहे. कारण सॅमसंग आता आपला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2 बाजारात आणणार आहे. हा फोन 1 सप्टेंबरला लॉन्च होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबद्दल कंपनीने अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार, 1 सप्टेंबरला Unpacked Part 2 इव्हेंटमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 2 स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर थेट पाहता येणार आहे. त्याच दिवशी, गॅलेक्सी झेड फोल्ड 2 ची किंमतही भारतात जाहीर केली जाईल. सॅमसंगने आपल्या ट्विटर हँडलवर या फोनचा एक फोटोही शेअर केला आहे. 6 महिन्यांत सगळं काही बदललं, ही लक्षणं असेल तर तुम्ही असू शकता कोरोना पॉझिटिव्ह या फोटोमध्ये फोन थोडा उघडलेला दिसत आहे. या स्मार्टफोनमध्ये वरच्या बाजूस दोन स्पीकर ग्रिल आहेत. तर फोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर बटण आणि साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहेत. या फोल्डेबल स्मार्टफोनसाठी सॅमसंगच्या यूके वेबसाइटवर प्री-बुकिंगही सुरू झालं आहे. सॅमसंगची साइट गॅलेक्सी झेड फोल्ड 2 चे प्रीम बुकिंग GBP 1,799 (अंदाजे 1,75,400 रुपये) सुरू आहे आणि त्याची शिपमेंट ही 17 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. PHOTOS: जावयाने सासरच्या 4 जणांची हत्या करून पुरलं, दीड वर्षानी जमीन उकरली आणि.. Galaxy Z Fold 2 काय आहे वैशिष्ट्ये? सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये इन्फिनिटी-ओ डिस्प्ले पॅनेल आणि अल्ट्रा-थिन ग्लास प्रोटेक्शन असणार आहे. हा फोन 120 हर्ट्झच्या रीफ्रेश रेटसह बाजारात येईल आणि यात 4,500mAh डुअल इंटेलिजंट बॅटरी असणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. हा फोल्डेबल फोन 5G सपोर्टसह येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.23 इंचाचा कव्हर डिस्प्लेसह 7.7 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले असून दोन्ही अमोलेड पॅनेल्स आहेत. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरे देण्यात आला आहे.
First published:

Tags: Tech news

पुढील बातम्या