मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

दमदार बॅटरी, खास ऑफर्स! Samsungच्या 'या' स्मार्टफोनची विक्री सुरू

दमदार बॅटरी, खास ऑफर्स! Samsungच्या 'या' स्मार्टफोनची विक्री सुरू

सॅमसंगच्या नव्या स्मॉर्टफोनची विक्री फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर सुरू झाली आहे. फोनची वैशिष्ट्य आणि ऑफर्स जाणून घ्या.

सॅमसंगच्या नव्या स्मॉर्टफोनची विक्री फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर सुरू झाली आहे. फोनची वैशिष्ट्य आणि ऑफर्स जाणून घ्या.

सॅमसंगच्या नव्या स्मॉर्टफोनची विक्री फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवर सुरू झाली आहे. फोनची वैशिष्ट्य आणि ऑफर्स जाणून घ्या.

मुंबई, 29 जून:  सॅमसंग गॅलॅक्सी एफ 13 (Samsung Galaxy F13) हा नवा स्मार्टफोन आज (29 जून) प्रथमच सेलच्या (Sale) माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) दुपारी 12 वाजल्यापासून त्याची विक्री सुरू झाली आहे. 6000mAh ची बॅटरी हे या फोनचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एफ 13 हा फोन दोन व्हॅरिएंट्समध्ये (Variant) आणला आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 11,999 रुपये अशी ठेवली आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तसंच सॅमसंग कंपनीने या स्मार्टफोनमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स दिली आहेत.

या सेलमध्ये उपलब्ध ऑफरबाबत बोलायचं झालं, तर आयसीआयसीआय बॅंकेच्या (ICICI Bank) कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांचा डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. तसंच, ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी ईएमआयची (EMI) सुविधादेखील दिली जात आहे. यासाठी सुरुवातीला केवळ 416 रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. सॅमसंग गॅलॅक्सी एफ 13मध्ये 6.6 इंच आकाराचा FHD+LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामुळे तुमचा स्क्रीन सिल्व्हर स्क्रीनमध्ये बदलू शकतो. या फोनच्या स्क्रीनवर गोरिल्ला ग्लास 5 (Gorilla Glass) आहे. त्यामुळे तुमच्या फोनवर कोणतेही डाग किंवा स्क्रॅच पडणार नाहीत.

हेही वाचा - Alexa मुळे हेसुद्धा शक्य झालं! प्रिय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतरही तुम्ही ऐकू शकता तिचा आवाज

या स्मार्टफोनमध्ये Exynos 850 चिपसेट, 4GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज (Internal Storage) आहे. या फोनची रॅम (Ram) व्हर्च्युअली 8GB पर्यंत वाढवता येते. हा फोन वॉटरफॉल ब्ल्यू, सनराइज कॉपर आणि नाइटस्की ग्रीन या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडीचा रंग निवडू शकतात.

सॅमसन गॅलॅक्सी एफ 13 मध्ये 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा (Triple Rear Camera) आहे. यात 5 मेगापिक्सेलची अल्ट्रावाइड लेन्स, 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड लेन्स उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये आहे 6000mAhची बॅटरी

पॉवरसाठी या फोनमध्ये 6000mAhची बॅटरी (Battery) देण्यात आली आहे. या बॅटरीला 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. सॅमसंगच्या न्यूजरूमने दिलेल्या माहितीनुसार, गॅलॅक्सी एफ13 अ‍ॅडाप्टिव्ह पॉवर सेव्हिंग (Adaptive Power Saving) आणि एआय पॉवर मॅनेजमेंटला (AI Power Management) सपोर्ट करतो. दमदार कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑटो डाटा स्विचिंग मोड देण्यात आला आहे. ही सुविधा असलेला गॅलॅक्सी सेगमेंटमधला हा पहिलाच फोन आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम मिळते.

Keywords : Samsung Galaxy F13, Sale, Flipkart, Variant, ICICI Bank, EMI, Gorilla Glass, Internal Storage, Ram, Triple Rear Camera, Battery, Adaptive Power Saving, AI Power Management, सॅमसंग F13, फ्लिपकार्ट, सेल, पावसाळी सेल

First published:

Tags: Samsung, Samsung galaxy offers