जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Alexa मुळे हेसुद्धा शक्य झालं! प्रिय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतरही तुम्ही ऐकू शकता तिचा आवाज

Alexa मुळे हेसुद्धा शक्य झालं! प्रिय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतरही तुम्ही ऐकू शकता तिचा आवाज

Alexa मुळे हेसुद्धा शक्य झालं! प्रिय व्यक्तीच्या मृ्त्यूनंतरही तुम्ही ऐकू शकता तिचा आवाज

Alexa मृत व्यक्तीच्या आवाजात तुमच्याशी बोलणार.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 29 जून : आपल्या अगदी जवळची, प्रिय व्यक्ती आपल्याला कायमची सोडून या जगातून निघून गेली की किमान एकदा तरी तिची झलक दिसावी, तिचा आवाज ऐकू यावा असं वाटतं. आता हे शक्य झालं आहे आहे. मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तुम्ही तिचा आवाज ऐकू शकता. तुमच्या कायम मदतीला येणारी अ‍ॅलेक्साच त्या व्यक्तीची आवाजाची आठवण तुमच्याकडे कायम ठेवेल. आता हे कसं शक्य आहे पाहुयात. अ‍ॅमेझॉननं (Amazon) बनवलेलं अ‍ॅलेक्सा (Alexa) हे टूल (Tool) युझर्सना खूप आवडतं. युझर्सना अ‍ॅलेक्सासोबत बोलायला, तसंच ऑर्डर देऊन तिच्याकडून बरीच कामं करून घ्यायला आवडतं. हीच अ‍ॅलेक्सा आता नवीन फीचरसह तुमच्या घरी येण्यासाठी तयार आहे. तसं पाहिलं तर अ‍ॅलेक्साचा इनबिल्ट आवाज युझर्सना आवडतो. परंतु, या नेहमीच्या आवाजाऐवजी ती तुम्हाला सतत ऐकायला आवडेल अशा व्यक्तीच्या आवाजात बोलू लागली तर तुम्हाला कसं वाटेल? हे वाचा -  Whatsapp Hack : अँड्रॉइड फोनवर टाइप न करता पाठवता येतो मेसेज, पाहा Photos अ‍ॅलेक्सावर तुमच्या आवडत्या व्यक्तीचा किंवा अगदी एखाद्या मृत नातेवाईकाचा आवाजही ऐकू शकणार आहात. या नव्या तंत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अ‍ॅलेक्सा मोठे सेलेब्रिटीज (Celebrity) किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या आवाजाची कॉपी करत होती. परंतु, आता हे टूल सर्वसामान्य व्यक्तींच्याही आवाजाची कॉपी करू शकणार आहे. अ‍ॅलेक्सामधला आवाज हा तुमच्या आवडत्या व्यक्तीचा किंवा नातेवाईकाचा (Relatives) असू शकेल.  लास व्हेगास (Las Vegas) येथे झालेल्या मार्स कॉन्फरन्समध्ये अ‍ॅमेझॉनने या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अ‍ॅलेक्सा हयात नसलेल्या लोकांच्या आवाजाची नक्कल करू शकणार आहे. कोरोना महासाथीत (Corona Pandemic) अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांच्या जवळ आणण्याचं काम अ‍ॅलेक्सा करेल. या माध्यमातून आम्ही युझर्ससोबत असलेलं नातं आणि विश्वास आणखी दृढ करू इच्छितो’, असं अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा एआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित प्रसाद यांनी सांगितलं. हे वाचा -  एका फोन कॉलमध्ये होईल तुमचं बँक अकाऊंट रिकामं, पश्चाताप टाळण्यासाठी लगेच करा ‘हे’ उपाय मिररच्या वृत्तानुसार, या प्रयत्नातून अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साला लोकांच्या भावनांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एखाद्या व्यक्तीच्या वेदना कमी करू शकत नाही. परंतु, त्यांच्या आठवणी नक्कीच ताज्या ठेवू शकते. उदाहरणार्थ, अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून एखादं लहान मूल त्याच्या दिवंगत आजीच्या आवाजात कथा ऐकू शकतं किंवा नातेवाईकाच्या आवाजात वेगळ्या काही गोष्टी ऐकू शकतं. अ‍ॅलेक्सा एका मिनिटात या तंत्रज्ञानाद्वारे आवाजाची कॉपी करू शकणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात