मुंबई, 1 जानेवारी : येत्या वर्षात अनेक मोठे ब्रँड्स त्यांचे बहुप्रतिक्षित फोन लाँच करणार आहेत. याची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे. यामध्ये अगदी महागड्या फोनपासून ते स्वस्तातल्या फोनचाही समावेश आहे. तुम्हाला सॅमसंग कंपनीचे फोन आवडत असतील, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F04 लाँच करणार आहे. ब्रँडचा हा फोन म्हणजे एंट्री लेव्हल डिव्हाइस असेल. कंपनी जानेवारीच्या सुरुवातीलाच हा हँडसेट लाँच करू शकते. हा फोन सॅमसंगच्या एफ-सिरीजचा भाग असेल आणि तो एक्सक्लुसिव्ह फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.
कंपनीने या हँडसेटला लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. लाँच होण्यापूर्वी या सॅमसंग हँडसेटची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स लीक झाली आहेत. फोन ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आणि 8GB RAM सह येऊ शकतो, असं म्हटलं जातंय. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. या स्मार्टफोनची लीक झालेली माहिती जाणून घेऊया.
फोनची किंमत किती आणि कधी लाँच होणार?
Samsung Galaxy F04 ची सुरुवातीची किंमत 7,499 रुपये असू शकते. म्हणजेच हे एंट्री लेव्हल बजेट डिव्हाईस असेल. हा फोन पर्पल आणि ग्रीन या दोन रंगांमध्ये येऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅमचा पर्याय मिळू शकते. कंपनीने अद्याप लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. पण हा फोन जानेवारी 2023 मध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध होऊ शकतो, असं म्हटलं जातंय.
हेही वाचा: एका चुकीमुळं हॅक होऊ शकतो तुमचा Smartphone अन् WhatsApp; त्वरित बदला ‘हे’ सेटिंग
काय असतील स्पेसिफिकेशन्स?
हा स्मार्टफोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह येईल. यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळू शकतो, जो वॉटर ड्रॉप स्टाइल नॉचसह येईल. तुम्हाला मागील बाजूस एलईडी फ्लॅशदेखील मिळेल. फोनची डिझाईन Samsung M13 5G सारखीच आहे. यामध्ये 8GB पर्यंत रॅम मिळू शकते.
रिपोर्ट्सनुसार, हा सॅमसंग फोन काही काळापूर्वी लाँच झालेल्या Samsung Galaxy A04e चं रीब्रँडेड व्हर्जन असू शकतं. या फोनमध्येही कंपनीने डुअल रियर कॅमेरा, 6.5-इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी दिली आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे, जो 2MP च्या सेकंडरी लेन्ससह येतो.
फ्रंटमध्ये कंपनीने 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइस Android 12 वर आधारित One UI वर चालतो. यामध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung, Samsung galaxy