मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /एका चुकीमुळं हॅक होऊ शकतो तुमचा Smartphone अन् WhatsApp; त्वरित बदला ‘हे’ सेटिंग

एका चुकीमुळं हॅक होऊ शकतो तुमचा Smartphone अन् WhatsApp; त्वरित बदला ‘हे’ सेटिंग

एका चुकीमुळं हॅक होऊ शकतो तुमचा Smartphone अन् WhatsApp; त्वरित बदला ‘हे’ सेटिंग

एका चुकीमुळं हॅक होऊ शकतो तुमचा Smartphone अन् WhatsApp; त्वरित बदला ‘हे’ सेटिंग

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हॅकर फोनमध्ये घुसण्याची शक्यता वाढली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये विशिष्ट प्रकारचं एक सेटिंग ऑन असेल तर त्याचा मोठा फटका बसू शकतो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 01 जानेवारी:  इन्स्टंट मॅसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप अल्पावधीत आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलं आहे. फोटो, व्हिडिओ किंवा माहिती क्षणार्धात समोरच्या व्यक्तीला पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची खूप मदत होत असते. याचा वापर करणाऱ्यांची संख्या जगामध्ये प्रचंड वाढली आहे. परंतु व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हॅकर फोनमध्ये घुसण्याची शक्यता वाढली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये विशिष्ट प्रकारचं एक सेटिंग ऑन असेल तर त्याचा मोठा फटका बसू शकतो.

  ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी हॅकर्स दर दिवशी नवनवीन पद्धती शोधून काढत असतात. अशीच एक GIF इमेजशी जोडली गेलेली पद्धत हॅकर्सनी शोधून काढली आहे. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी हॅकर्स फिशिंग लिंकचा वापर करत असल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. परंतु आता फिशिंग GIF चा वापर केला जात आहे. यामुळे धोका वाढला आहे. GIF च्या मदतीनं हॅकर्स फोनमध्ये घुसत आहेत.

  आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काही सेटिंग्ज ऑन ठेवतात. बहुतांश जणांना या सेटिंग्जबद्दल माहितीही नसतं. हॅकर्स याच गोष्टीचा फायदा घेत असतात. या सेटिंगच्या माध्यमातून हॅकर्स फोनमध्ये सहज प्रवेश करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ते सेटिंग तुम्ही न पाहता ऑन ठेवलं असेल, तर हॅकिंगची शिकार होऊ शकता, असा इशाराही दिला जात आहे.

  हेही वाचा: World's Fastest Electric Car: मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा

  नेमका काय आहे प्रकार

  आजवर हॅकर्स ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी फिशिंग लिंकचा वापर करत होते. परंतु आता एक नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली आहे. हॅकर्स आता GIF इमेजमध्ये फिशिंग अटॅक इम्प्लांट करत आहेत. याला GIFShell नाव दिलं गेलं आहे. मागील वर्षीपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हा दोष कायम होता. त्यामुळे हॅकर्स केवळ GIF इमेजला पाठवून कोणाचाही फोन हॅक करत होते. व्हॉट्सअ‍ॅपने या दोष शोधून त्यावर उपाय काढला आहे; पण युझर्सच्या चुकांमुळे आजही हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप आणि फोनचा अ‍ॅक्सेस मिळवू शकतात. अनेकांच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Media Auto Download हे फीचर ऑन राहतं. ते सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही ऑफ केलं नाही तर अनोळखी सोर्सकडून येणारे व्हिडिओ, GIF, इमेज आणि इतर फाइल्स आपोआप डाउनलोड होत जातात. हॅकर्स याचाच फायदा घेऊ शकतात.

  सेटिंग बंद करण्यासाठी ही आहे पद्धत

  व्हॉट्सअ‍ॅप युझर्स सेटिंग सहज पद्धतीने बंद करू शकतात. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जायला हवं. तिथं Storage And Data हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करावं. त्यानंतर Automatic Media Download हा पर्याय तिथं असेल. सेटिंगमध्ये जाऊन तो ऑफ करायला हवा. ही पद्धत अवलंबून सहजरीत्या हॅकर्सची इंट्री रोखली जाऊ शकते.

  First published:

  Tags: Smartphone, Whatsapp