मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कमाल! Royal Enfield च्या या बाईकला मॉडिफाय करुन बनवलं 4-Wheel ATV, वाचा कसा केला हा 'कार'नामा

कमाल! Royal Enfield च्या या बाईकला मॉडिफाय करुन बनवलं 4-Wheel ATV, वाचा कसा केला हा 'कार'नामा

रॉयल एनफील्डच्या हिमालयन (Royal Enfield Himalayan) या बाईकला फोर व्हीलर ऑल टॅरेन व्हेइकलमध्ये रुपांतरीत केलं आहे. याचं मॉडिफिकेशन इतकं अप्रतिम केलंय, की जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत कोणालाही हे मॉडिफाय असल्याचं कळत देखील नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 9 जून : काही लोकांना एखाद्या गोष्टीचं झपाटल्यासारखं वेड असतं. त्यामुळे अशी काही अफलातून जगावेगळी कामगिरी करतात, की दुनिया थक्क होते. यासाठी वय, शिक्षण, ठिकाण याची काहीही अट नसते, हवं असतं फक्त पॅशन. अशीच वाहनांबद्दलची कमालीची पॅशन असणाऱ्या एका भारतीयाने चक्क रॉयल एनफील्डच्या (Royal Enfield ) हिमालयन (Royal Enfield Himalayan) या बाईकला फोर व्हीलर ऑल टॅरेन व्हेइकलमध्ये रुपांतरीत केलं आहे. याचं मॉडिफिकेशन इतकं अप्रतिम केलंय, की जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत कोणालाही हे मॉडिफाय असल्याचं कळत देखील नाही.

ही किमया केली आहे राजस्थानमधील जयपूर शहरातील कुंवर कस्टम्स (Kunwar customs) या वाहनांच्या कस्टमायझेशनचं काम करणाऱ्या वर्कशॉपने. इंजिन, बॉडी आणि टायर्समध्ये बदल करून रॉयल एनफील्डच्या या बाईकचा कायापालट करण्यात आला आहे. फोटो बघून अजिबात लक्षात येणार नाही, की ही ओरीजनल फोर व्हील ऑल टॅरेन व्हेइकल (AVT) नसून रॉयल एनफील्डच्या बाईकचा कायापालट आहे.

तीन महिन्यांचा कालावधी आणि साडेतीन लाख रुपयांचा खर्च -

यूट्यूबवर वँप व्हिडिओ या चॅनलने या सगळ्या प्रक्रियेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत या बाईकच्या कस्टमायजेशन बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने रॉयल एनफील्ड हिमालयनला या लूकमध्ये मॉडिफाइड केलंय, यावर जवळपास साडेतीन लाख रुपयांचा खर्च केला आहे. हे रुपांतर करण्यासाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागला आहे.

(वाचा - राज्यात लवकरच नवी Electric Vehicle पॉलिसी; मुंबईसह या शहरांवर होणार परिणाम)

AVT इंजिनची विशेषता -

या व्हेईकलमध्ये 411 सीसीचं सिंगल सिलेंडर इंजिन लावण्यात आलं आहे. ते 24.3 bhp च्या पॉवर 6500 rpm आणि 32nm, तसंच पीक टॉर्क 4500 rpm सह तयार केलं गेलं आहे. या फोर व्हील ऑल टॅरेन व्हेइकलच्या गियरबॉक्समध्ये (AVT) पाच स्पीड गियर देण्यात आले आहेत.

बॉडी फ्रेमिंग -

या बाईकच्या बॉडी फ्रेमचं लोअर सेक्शन, चेनसेट हे एलिमेंट्स तसेच ठेवण्यात आले आहेत. तर बरेच एलिमेंट्स बदलले आहेत. इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि हँडलबार जुन्या थंडरबर्ड 350 चे वापरले आहेत. एटीव्हीचे सर्व बॉडी पॅनल फायबर प्लास्टिकपासून बनलेले आहेत. फ्यूअल टँकला बॉडीसोबत सिंक्रोनाईझ करण्यासाठी कस्टमायझरने मूळ टँकऐवजी मॅटेलिक टँक वापरला आहे.

(वाचा - WhatsAppमध्ये End-to-end encryption नेमकं आहे तरी काय?जाणून घ्या हे कसं काम करतं)

नॉबी ऑल टेरेन टायर्ससोबत मशीन कट अलॉय व्हिल्स -

या स्टायलिश व्हेइकलमध्ये नॉबी ऑल टेरेन टायर्ससह मशीन कट अलॉय व्हिल्स, रिअर व्हिल्सवर सिंगल डिस्क्स, फ्रंट व्हिल्सवर ड्यूअल-डिस्क ब्रेक सेटअप आणि चारही बाजूंनी एलइडी रिंग्ससोबत एलइडी हेडलाइट्स आहेत. तसंच मागच्या बाजूला लगेज रॅक बसवण्यात आली आहे. बाईकवर ब्रँडचं नाव कायम ठेवण्यासाठी कुंवर कस्टम्सने कस्टम रॉयल एनफील्ड ब्रँडिंग आणि बॉडी डिकल्स जोडले आहेत.

First published:

Tags: Car