OMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह!

OMG VIDEO : या हायटेक रेस्टॉरंटमध्ये चक्क रोबो करतात सर्व्ह!

तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या वेटरने तुम्हाला लगेच 'अटेंड' करावं, असं तुम्हाला वाटतं. पण कल्पना करा... तुम्ही एका हायटेक रेस्टॉरंटमध्ये आहात आणि एक रोबो वेटर तुमच्यापुढे येऊन पुढे ठाकली तर तुम्ही काय कराल?

  • Share this:

चेन्नई, 20 जुलै : तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथल्या वेटरने तुम्हाला लगेच 'अटेंड' करावं, असं तुम्हाला वाटतं. पण कल्पना करा... तुम्ही एका हायटेक रेस्टॉरंटमध्ये आहात आणि एक रोबो वेटर तुमच्यापुढे येऊन पुढे ठाकली तर तुम्ही काय कराल?

चेन्नईमध्ये असं एक रोबो रेस्टॉरंट आहे. इथे हॉटेलमालकाच्या आदेशानुसार चार रोबो काम करतात. हे भारतातलं पहिलंवहिलं रोबो रेस्टॉरंट आहे.

कार्तिक आणि व्यंकटेश यांनी 2017मध्ये हे रेस्टॉरंट सुरू केलं. सना, अॅलिस अशा नावाच्या रोबो वेटर इथे आहेत. तुम्हाला तुमची ऑर्डर द्यायची असेल तर टेबलवर ठेवलेल्या टॅबवर ऑर्डर सिलेक्ट करायची. मग ही ऑर्डर मास्टर टॅबवर जाते.

किचनमध्ये तुमची ऑर्डर तयार झाली की या रोबो ती घेऊन येतात. तुम्ही या रोबोकडून तुमच्या डिशेस घ्यायच्या. ऑर्डर मिळाली की या रोबोचं एक्झिट बटन दाबायचं. म्हणजे रोबो पुन्हा एकदा किचनमध्ये जाते.

या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या तरुण कस्टमर्सना हे रोबो खूपच आवडतात पण जुन्या पिढीतल्या लोकांना अजूनही माणसांनीच जेवण वाढावं, असं वाटतं. सध्या तरी हे रोबो तुम्हाला काय हवं ते फक्त आणून देतात. पुढच्या काळात तर हे रोबो तुम्हाला काय ऑर्डर करायची आहे हे समजून घेण्यासाठी तुमचं मनही वाचू शकतील !

3 फूट उंचीमुळे मेडिकलला नव्हता प्रवेश पण आता कोर्टाचा ग्रीन सिग्नल

रेस्टॉरंटचे मालक सांगतात, या रोबोंना तांत्रिकदृष्ट्या अपडेट ठेवण्यासाठी खर्च करावा लागतो पण दर महिन्याला यांना पगार द्यावा लागत नाही. शिवाय सणासुदीला या रोबोंना रजाही द्याव्या लागत नाहीत. इथे येणाऱ्या पाहुण्यांना त्यांना टिप्स द्यायचीही गरज नाही. त्यामुळे हे रोबो खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच परवडतात.

इथल्या या रोबो वेटर सध्या सगळ्यांचं आकर्षण ठरल्या आहेत. त्यामुळे हे रेस्टॉरंट सुपरहिट आहे!

===================================================================================================

VIDEO : भावी मुख्यमंत्री होण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 08:23 PM IST

ताज्या बातम्या