भावनगर (गुजरात), 20 जुलै : मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं आपण म्हणतो. गुजरातच्या भावनगरमधल्या गणेशबद्दलही असंच काहीसं घडलं. गणेशला नीट परीक्षेमध्ये 223 गुण मिळाले पण त्याच्या कमी उंचीमुळे मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश दिला जात नव्हता. PHOTO:शीला दीक्षित यांच्याबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 2018 मध्ये त्याचं वय 17 वर्षांचं होतं पण एवढं वय असूनही त्याची उंची 3 फूट आणि वजन 14 किलो होतं. गणेशची शारीरिक क्षमता नसल्यामुळे त्याला मेडिकलला प्रवेश नाकारला गेला. असं झालं तरी गणेशने हार मानली नाही. त्याने याविरोधात कायदेशीर लढाई द्यायचं ठरवलं.गणेशने याआधी हायकोर्टामध्ये दाद मागितली होती. पण तिथे त्याची निराशा झाली. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला गणेशला प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन गणेशला डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करायची होती पण उंची आणि अपंगत्वामुळे त्याला मेडिकलचा प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला होता. आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. एखाद्याची उंची कमी असली तरी त्याला हवं त्या करिअरपासून कुणीही रोखू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. गणेश आता 18 वर्षांचा झाला आहे आणि त्याचं वजन 14 किलो वरून 15 किलोवर गेलं आहे. त्याची उंची मात्र अजून 3 फूटच आहे. असं असलं तरी या शारीरिक मर्यादेवर मात करून गणेश आता मेडिकलचा अभ्यास करू शकणार आहे. डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचं त्याचं स्वप्नही सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे पूर्ण होणार आहे. =========================================================================================== VIDEO : अजित पवारांचं चंद्रकांत पाटलांना जशास तसे उत्तर, दिले हे थेट आव्हान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.