मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Drone उडवताय? सावधान! सरकारनं जारी केले नवे नियम, आता याच गोष्टींसाठी करता येणार वापर

Drone उडवताय? सावधान! सरकारनं जारी केले नवे नियम, आता याच गोष्टींसाठी करता येणार वापर

आता ड्रोन उडवण्यावरही  (New Rules For Drone) निर्बंध येणार आहेत. भारत सरकारनं (Government of India) यासंदर्भात काही नियम जारी केले आहेत.

आता ड्रोन उडवण्यावरही (New Rules For Drone) निर्बंध येणार आहेत. भारत सरकारनं (Government of India) यासंदर्भात काही नियम जारी केले आहेत.

आता ड्रोन उडवण्यावरही (New Rules For Drone) निर्बंध येणार आहेत. भारत सरकारनं (Government of India) यासंदर्भात काही नियम जारी केले आहेत.

नवी दिल्ली 15 मार्च : आतापर्यंत अनेकजण ड्रोन (Drone) केवळ छंद म्हणून उडवत होते. मात्र, आता ड्रोन उडवण्यावरही निर्बंध येणार आहेत. भारत सरकारनं (Government of India) यासंदर्भात काही नियम जारी केले आहेत. हे नियम मोडून जर ड्रोन उडवलं तर तुमच्यावर होणाऱ्या कारवाईसाठीही सज्ज राहा. नव्या नियमानुसार आता 250 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे ड्रोन केवळ रिमोट पायलटच उडवू शकतात. यासाठी नागरी उड्डाण महासंचालकांची (DGCA) परवानगी घेणंही बंधनकारक असणार आहे. ड्रोनसाठीचे हे नवे नियम (New Rules For Drone) भारतात शुक्रवारपासून लागू करण्यात आले आहेत.

या नव्या नियमांबद्दल विचार करुन आणि सल्ला घेऊन दहा महिन्यांनंतर अंतिम रुप देण्यात आलं आहे. मात्र, आताही ड्रोनचा वापर सामान वाहतुकीसाठी करता येणार नाही. मानवरहित विमान प्रणाली नियम 2021 अंतर्गत ड्रोनच्या व्यक्तिक, व्यावसायिक, संशोधन, टेस्टिंग, प्रोडक्शन किंवा याच्या इम्पोर्टसंबंधी नियम जारी करण्यात आले आहेत. नियमांनुसार, असं कोणतंही ड्रोन नॅनो कॅटेगिरीमधील असलं किंवा त्याचं वजन 250 ग्रॅमपेक्षा कमी असलं तरीही परवानगी घेण्याची गरज असणार आहे.

मायक्रो ड्रोनला उड्डाणाआधी परवानगी घ्यावी लागणार आहे. मायक्रो ड्रोनचं वर्गीकरण साधारण 250 ग्रॅम वजनाचे किंवा दोन किलोग्रॅमपेक्षा कमी असं केलं गेलं आहे. यासोबत ड्रोनची अनधिकृत आयात, खरेदी, विक्री किंवा भाड्यानं देणं मानव रहित विमान प्रणाली नियम 2021 अंतर्गत दंडात्मक ठरणार आहे. यासाठी तुम्हाला भरपाईदेखील द्यावी लागू शकते. याशिवाय ट्रोल उडवणाऱ्याकडे रिमोट पायलटचं लायसन नसल्यास हादेखील अपराध मानला जाणार आहे. नव्या नियमानुसार, ड्रोनचा वापर सामान वाहतुकीसाठी करता येणार नाही. याचा वापर केवळ सर्व्हे, फोटोग्राफी तसंच सुरक्षा आणि विविध माहिती घेण्यासाठीच करता येणार आहे.

First published:

Tags: Central government, Drone shooting, Rules, Tech news, Technology