मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /100 रुपये स्वस्त झाला Jio चा हा Recharge Plan, एक वर्षासाठी Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन फ्री

100 रुपये स्वस्त झाला Jio चा हा Recharge Plan, एक वर्षासाठी Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन फ्री

आता जिओने (Jio) आपला एक रिचार्ज प्लॅन 100 रुपये स्वस्त केला आहे. त्याशिवाय या प्लॅनसह डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शनही (Disney+ Hotstar) दिलं जात आहे.

आता जिओने (Jio) आपला एक रिचार्ज प्लॅन 100 रुपये स्वस्त केला आहे. त्याशिवाय या प्लॅनसह डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शनही (Disney+ Hotstar) दिलं जात आहे.

आता जिओने (Jio) आपला एक रिचार्ज प्लॅन 100 रुपये स्वस्त केला आहे. त्याशिवाय या प्लॅनसह डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शनही (Disney+ Hotstar) दिलं जात आहे.

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी: रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये (Recharge Plan) वाढीची घोषणा करत 1 डिसेंबर 2022 पासून रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले. तसंच अनेक रिचार्ज प्लॅन बंदही केले. आता जिओने (Jio) आपला एक रिचार्ज प्लॅन 100 रुपये स्वस्त केला आहे. त्याशिवाय या प्लॅनसह डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शनही (Disney+ Hotstar) दिलं जात आहे.

रिचार्ज महाग झाल्यानंतर हा प्लॅन 601 रुपयांचा झाला. परंतु आता हाच प्लॅन 499 रुपये करण्यात आला आहे.

Jio च्या या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2GB हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल, दररोज 100 SMS दिले जातात. त्याशिवाय या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं मोबाइल सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी दिलं जात आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

हा प्लॅन पुन्हा एकदा आणण्यात आला आहे. हा रिचार्ज महाग होण्याआधी या प्लॅनची किंमत 499 रुपये होती. परंतु रिचार्ज महाग झाल्यानंतर याचा दर वाढवून 601 रुपये करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा किंमत 499 करण्यात आली आहे.

हे वाचा - वर्षभरापूर्वी आलेला FASTag आता बंद होणार? पुन्हा बदलणार Toll Collection ची पद्धत

601 रुपयांत काय बेनिफिट्स -

601 रुपयांचा प्लॅन ओटीटी सब्सक्रिप्शनसह 3GB हाय स्पीड डेटासह होता. यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस आणि Disney+ Hotstar चं मोबाइल सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी दिलं जात होतं. त्याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चं रेग्युलर सब्सक्रिप्शनही मिळत होतं. हे आता 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्येही दिलं जात आहे. 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा संपल्यानंतर 64kbps चा स्पीड मिळेल.

हे वाचा - Paytm Offer! मोफत LPG Cylinder मिळवण्याची संधी, पाहा काय आहे प्रोसेस

Airtel 499 रुपयांचा प्लॅन -

Disney+ Hotstar सह येणारा एयरटेलचा (Airtel) हा पहिला प्लॅन 499 रुपयांचा आहे. प्लॅन 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह असून यासह Disney+ Hotstar चं मोबाइल प्लॅन सब्सक्रिप्शन मिळतं. तसंच दररोज 3GB डेटा, फ्री कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा आहे. या प्लॅनसह युजर्सला एयरटेल थँक्सचाही फायदा मिळेल. ग्राहकांना Amazon Prime Video मोबाइल वर्जन, एयरटेल एक्सस्ट्रिम प्रीमियम, फ्री हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक, शॉ अॅकेडमी, फास्टॅग रिचार्जवर 100 रुपये कॅशबॅकही दिला जातो.

Vodafone-Idea -

वोडाफोन-आयडियाचा 501 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. यात 3GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS, एक वर्षासाठी Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन मिळतं. बिंग ऑन नाइट डेटा, विकेंड डेटा रोलओवर, VI Movies, TV VIP ची सुविधा दिली जाते.

First published:
top videos

    Tags: Airtel, Amazon subscription, Discount offer, Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news, Technology