नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड (Jio Platforms Limited) आणि जागतिक सॅटेलाइट बेस्ड कन्टेन्ट कनेक्टिव्हिटी सोल्यूशन प्रोव्हाइडर (SES) यांनी 14 फेब्रुवारी रोजी एका संयुक्त उपक्रमाची (Joint Venture) स्थापना करण्याची घोषणा केली आहे. जिओ स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेड सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा (Jio Space Technology Limited) वापर करुन भारतात पुढील जनरेशनला परवडणाऱ्या दरात ब्रॉडबँड सेवा (Broadband Services) पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
Jio Platforms Limited आणि SES चे जॉइंट व्हेन्चरमध्ये अनुक्रमे 52 टक्के आणि 49 टक्के इक्विटी स्टेक असतील. हा संयुक्त उपक्रम मल्टी ऑर्बिट स्पेस नेटवर्क्सचा (Multi-Orbit Space Networks) वापर करेल, जे जिओस्टेशनरी (Geostationary (GEO) आणि मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट (Medium Earth Orbit (MEO) असेल. भारतातील आणि शेजारील देशातील एंटरप्रायजेस, मोबाइल बॅकहॉल आणि किरकोळ ग्राहकांना मल्टी गीगाबिट लिंक्स (Multi-Gigabit Links) वितरित करण्यास सक्षम असेल.
हा संयुक्त उपक्रम भारतात ठराविक आंतरराष्ट्रीय वैमानिक आणि सागरी ग्राहक (Aeronautical and Maritime Customers) वगळता SES सॅटेलाइट डेटा आणि कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठीचं एक वाहक असेल. SES कडून यात 100 gbps ची क्षमता असेल आणि SES बाजारातील जिओच्या प्रीमियर स्थितीचा फायदा घेत ही संधी अनलॉक करण्यासाठी काम करेल.
देशात सेवा प्रदान करण्यासाठी एक गुंतवणूक म्हणून हा संयुक्त उपक्रम भारतात व्यापक पायाभूत सुविधा विकसित करेल. जिओ (Jio) या संयुक्त उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून यासाठी करार केला आहे. ठराविक टप्प्यांवर आधारित जवळपास 100 मिलियन डॉलर करार मूल्यासह खरेदी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance, Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news