नवी दिल्ली, 6 डिसेंबर : टेलिकॉम कंपनी Jio ने नुकतेचं आपले प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले. त्यानंतर कंपनीने आता आपला 20 टक्के कॅशबॅक प्लॅन पुन्हा एकदा रिवाइज केला आहे. हे कॅशबॅक प्लॅन याचवर्षी लाँच करण्यात आले होते.
आधी या प्लॅनची किंमत 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपये होती. Jio युजर्सला या ऑफरअंतर्गत या प्लॅनसह कॅशबॅक दिला जात होता. कॅशबॅक युजरच्या अकाउंटमध्ये रिचार्जच्या तीन दिवसांत क्रेडिट केले जातात.
युजर्स कॅशबॅकचा फायदा Reliance Retail चॅनल्स आणि स्टोर्स JioMart, Reliance Smart, Ajio, Reliance Trends, Reliance Digital आणि Netmeds कडून घेऊ शकतात. आता ही कॅशबॅक ऑफर 299 रुपये, 666 रुपये आणि 719 रुपयांच्या प्लॅनवर दिला जात आहे. म्हणजेच या प्लॅनसह 20 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे.
कॅशबॅक ऑफर लागू होण्यासाठी Reliance Retail चॅनल्सवरुन रिचार्ज करावा लागेल. कंपनीने याला JioMart Maha Cashback असं नाव दिलं आहे.
299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GB डेटा, अनलिमिडेट कॉल्स आणि दररोज 100 SMS दिले जातात.
666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिडेट कॉल, 100 SMS आणि Jio Apps चा अॅक्सेस दिला जातो.
719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिडेट कॉल्स दिले जातात. या प्लॅनची वॅलिडिटी 84 दिवसांची असून या प्लॅन्ससह युजर्सला 144 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
दरम्यान, 25 आणि 26 नोव्हेंबरपासून Vodafone Idea आणि Airtel ने आपल्या रिचार्ज दरात वाढ केली आहे. Airtel ने टॅरिफ वाढवण्याची घोषणा केल्याच्या एक दिवसानंतर Vodafone-Idea नेही टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.