मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फक्त भारतातील नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन; Jio-Google च्या भागीदारीत होणार लाँच

फक्त भारतातील नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन; Jio-Google च्या भागीदारीत होणार लाँच

अँड्रॉईड बेस्ड या स्मार्टफोनचं ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गुगलने मिळून विकसित केलं आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली, की नवा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असा आहे. हा स्मार्टफोन अतिशय स्वस्त असून 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 जून : रिलायन्स इंडस्ट्रीजची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (RIL AGM 2021) आज पार पडली. या सभेत अनेक घोषणाही करण्यात आल्या. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (CMD Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओ आणि गुगलसह भागीदारीत नवा स्मार्टफोन जिओफोन-नेक्स्टची घोषणा केली आहे. नवा स्मार्टफोन जिओ आणि गुगलच्या फीचर्स आणि अ‍ॅप्ससह लाँच होईल. अँड्रॉईड बेस्ड या स्मार्टफोनचं ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गुगलने मिळून विकसित केलं आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली, की नवा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असा आहे. हा स्मार्टफोन अतिशय स्वस्त असून 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होणार आहे.

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन -

भारतीय बाजाराच्या दृष्टीने खास तयार करण्यात आलेल्या जिओफोन-नेक्स्ट स्मार्टफोनवर युजर्स गुगल प्लेवरुन अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा आणि अँड्रॉईड अपडेटही मिळणार आहे. Fully Featured हा स्मार्टफोन मुकेश अंबानी यांनी भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले सुंदर पिचाई?

मागील वर्षी रिलायन्स जिओने गुगलसोबत भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नव्या स्मार्टफोनबाबत बोलताना सांगितलं, की 'आमचं पहिलं पाउल Google आणि Jio च्या सहयोगाने बनवलेल्या नवीन परवडणारा स्मार्टफोन आहे. हा फोन भारतासाठीच तयार करण्यात आला आहे आणि यामुळे अशा लाखो युजर्सला फायदा होईल जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. गुगल क्लाउड आणि जिओ दरम्यान नवीन 5G भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटशी जोडणी करण्यात मदतशीर ठरेल तसंच भारताच्या पुढच्या टप्प्यातील डिजिटायझेशनची पायाभरणी करण्यासही मदत करेल.'

(वाचा - कोरोनाविरोधात रिलायन्सची मोठी लढाई, 2 आठवड्यात 1100 मेट्रिक ॲाक्सिजन निर्मिती)

गेम चेंजर -

जिओफोन-नेक्स्टच्या किमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फोन अतिशय कमी किमतीत उपलब्ध होईल. जिओ-गुगलचा हा अँड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन जिओफोन-नेक्स्ट गेम चेंजर ठरेल. हा फोन अशा 30 कोटी लोकांचं आयुष्य बदलू शकतो, ज्यांच्याकडे अद्यापही 2G मोबाईल सेट आहे.

डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ चालविणार्‍या नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टच्या नियंत्रणाखाली आहेत,  याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.

First published:

Tags: Reliance, Reliance Industries Limited, Reliance Jio