मराठी बातम्या /बातम्या /मनी /कोरोनाविरोधात रिलायन्सची मोठी लढाई, 2 आठवड्यात 1100 मेट्रिक ॲाक्सिजन निर्मिती

कोरोनाविरोधात रिलायन्सची मोठी लढाई, 2 आठवड्यात 1100 मेट्रिक ॲाक्सिजन निर्मिती

'कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली. आज रिलायन्स 11 टक्के पेक्षा जास्त मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजन तयार करत आहे.'

'कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली. आज रिलायन्स 11 टक्के पेक्षा जास्त मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजन तयार करत आहे.'

'कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली. आज रिलायन्स 11 टक्के पेक्षा जास्त मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजन तयार करत आहे.'

नवी दिल्ली, 24 जून: रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज, 24 जून रोजी पार पडली. दुपारी दोन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (Video Conferencing) आणि अन्य ऑडिओ-व्हिज्युअल (Audio-Video Aids) माध्यमांमधून ही सभा घेण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या सभेत तीन कोटींहून अधिक शेअरधारकांशी (Shareholders) संवाद साधला. या सभेत त्यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या आहे. कोरोना काळात रिलायन्सने कोरोनाविरोधात मोठा लढाही दिला.

'कोरोना काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली. आज रिलायन्स भारतातील 11 टक्के पेक्षा जास्त मेडिकल ग्रेड लिक्विड ऑक्सिजन तयार करत आहे. एकाच कंपनीकडून एकाच ठिकाणी हा ऑक्सिजन तयार केला जात आहे. हा प्राणवायू-ऑक्सिजन आम्ही रुग्णांना मोफत देत आहोत.'

नवी मुंबईत सुरू करणार जिओ इन्स्टिट्यूट; शैक्षणिक सत्राबाबत रिलायन्सची मोठी घोषणा

'या क्षमतेचा नवीन वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्यास साधारणपणे एक वर्षाचा कालाधी लागतो. परंतु रिलायन्सच्या इंजिनियर्सनी तो 10 दिवसांपेक्षा कमी वेळात तयार केला. यापूर्वी अशाप्रकारे कधीही मेडिकल ऑक्सिजन तयार केलेला नाही, परंतु कोरोना काळात दोन आठवड्यात दररोज 1100 मेट्रिक टन उत्पादन केलं', अशी माहिती नीता अंबानी यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकट्या मुंबईत 875 बेड तयार केले. तर संपूर्ण भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासह, मोफत औषधोपरचारांसह सुसज्ज 2000 बेड्सची क्षमता तयार केली, असंही त्या म्हणाल्या.

ऑक्सिजन पुरवठा साखळीत आम्ही भारतातील गंभीर अडथळ्यांवर लक्ष दिलं. रिलायन्सने 100 नवे मेडिकल ग्रेड ऑक्सिजन टँकर खरेदी भारतासह, भारताबाहेरुनही जर्मनी, सिंगापूर, नेदरलँड्स, बेल्जियम, थायलंड, इंडोनेशियातून खरेदी केले आणि ते दोन आठवड्यात दाखल सेवेत आले, असं नीता अंबानी यांनी सांगितलं.

डिस्क्लेमर: https://lokmat.news18.com/ चालविणार्‍या नेटवर्क 18 आणि टीव्ही 18 या कंपन्या स्वतंत्र मीडिया ट्रस्टच्या नियंत्रणाखाली आहेत,  याचा रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.

First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply, Reliance Industries, Reliance Industries Limited