नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : Xiaomi चा 48 मेगापिक्सलचा Redmi Note 7 Pro हा फोन आता स्वस्त होणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 13 हजार 999 इतकी होती. कंपनीने 2019 च्या सुरुवातीला हा फोन लाँच केला होता. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे.
याशिवाय 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 16 हजार 999 इतकी होती. आता या दोन्हीच्या किंमतीत 2 हजार रुपयांची कपात करण्यता आली आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा फोन 11 हजार 999 रुपयांना तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 14 हजार 999 रुपये झाली आहे.
किंमती कमी झाल्यानंतर हे फोन फ्लिपकार्टसह कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. कंपन्या नवीन मॉडेल लाँच करण्यापूर्वी जुन्या फोनच्या किंमती कमी करते. त्यामुळे तज्ज्ञांचे मत आहे की कंपनी रेडमी नोट 8 लाँच करू शकते. चीनमध्ये नव्या नोट सिरीजमधील फोन लाँच करण्यात आले आहेत.
चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमी नोट 8 ची किंमत 10 हजार रुपये तर रेडमी नोट 8 प्रोची किंमत 14 हजार रुपये आहे. भारतात मात्र हे फोन कधी लाँच होतील याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
वाचा : Google वर या 8 गोष्टी चुकूनही Search करू नका; होईल मोठं नुकसान
रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340x1080 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.3 इंच फुल एचडीसह डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचं खास वैशिष्ठ्य म्हणजे त्याचा कॅमेरा. रेडमी नोट 7 प्रोमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून 13 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेटचा प्रोसेसर असून अॅड्रिनो 62 जीपीयूसह चालतो.
वाचा : Tiktokला टक्कर देण्यासाठी Google आणणार नवीन अॅप, असे असतील फिचर्स
VIDEO: वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राभला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा