• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो Redmi Note 11, किंमत झाली लीक; हे आहेत फिचर्स

8GB RAM सह लॉन्च होऊ शकतो Redmi Note 11, किंमत झाली लीक; हे आहेत फिचर्स

या फोनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फीचर्स बाबतची माहिती लीक झाली आहे. त्यामुळे हा फोन केव्हा लॉन्च होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: स्मार्टफोन बनवणारी चीन येथील कंपनी शाओमी (Xiaomi) आपल्या रेडमी नोट (Redmi Note) सीरिजमधील नव्या जनरेशनमधील रेडमी नोट 11 (Redmi Note 11) लवकरच बाजारात लाँच करणार आहे. चीनमधील सोशल मीडिया Weibo वर कंपनीने रेडमी नोट 11 सीरिज लॉन्च  करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनी 11 नोव्हेंबरपूर्वी नोट 11 सीरिज लॉन्च  करू शकते. अर्थात नवीन रेडमी नोट 11 आणि नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro) हे फोन बाजारात लाँच होण्यापूर्वीच त्यांची किंमत किती असू शकेल, याबाबतची माहिती लीक झाली आहे. शाओमी रेडमी नोट 11 सीरिजची किंमत किती असेल, याबाबतची माहिती लीक झाली आहे. त्यानुसार रेडमी नोट 11 स्मार्टफोन हा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आणि 8GB RAM आणि 128GB स्टोरेज अशा दोन प्रकारामध्ये लाँच केला जाईल. रेडमी नोट 11 या स्मार्टफोनमधील 6GB RAM + 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1,199 युआन म्हणजे सुमारे 14,000 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 1599 युआन म्हणजे सुमारे 18,500 रुपये असू शकते. हेही वाचा-  Tata ची SUV Tata Punch भारतात लाँच, जाणून घ्या जबरदस्त कार्सचे फीचर्स आणि किंमत तर, रेडमी नोट 11 प्रो स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये लॉन्च  केला जाऊ शकतो. यापैकी 6GB RAM + 128GB स्टोरेज फोनची किंमत 1599 युआन म्हणजेच सुमारे 18,500 रुपये असू शकते. त्याचप्रमाणे, 8GB RAM + 128 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1799 युआन म्हणजे सुमारे 20,900 रुपये आणि 8 GB RAM + 256 GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1999 युआन म्हणजेच सुमारे 23,300 रुपये असू शकते. हेही वाचा-  WhatsApp वर क्वालिटी कमी न करता असे पाठवा HD फोटो, पाहा सोपा पर्याय
 दर्जेदार बॅटरी
आगामी रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला LCD पॅनल मिळू शकते, जे 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. ऑप्टिक्सबद्दल बोलायचं झालं तर 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा फोनमध्ये मिळू शकतो. डिव्हाइसमध्ये मीडिया टेक डायमेंसिटी 810 (MediaTek Dimensity 810) प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनला 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. गेल्या अनेक दिवसांपासून रेडमी नोट 11 सीरिज चर्चेत आहे. या फोनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फीचर्स बाबतची माहिती लीक झाली आहे. त्यामुळे हा फोन केव्हा लॉन्च होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Published by:Pooja Vichare
First published: