मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /फक्त 499 रुपयांमध्ये खरेदी करा 8 हजारांचा फोन, Amazon Holi sale धम्माकेदार ऑफर

फक्त 499 रुपयांमध्ये खरेदी करा 8 हजारांचा फोन, Amazon Holi sale धम्माकेदार ऑफर

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

जर तुम्ही स्वस्त:त एक चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा रेडमी फोन तुमच्यासाठी एक चांगली डील आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : अगदी काहीच दिवसांवर होळी आली आहे. लोक होळीच्या तयारीला लागले आहेत, तर कोकणकर देखील गावाला जाण्याच्या लगबगीला लागले आहेत. पण या सगळ्यात आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे आणि ते म्हणजे फोन. हो कारण ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन होळी स्पेशल सेलमध्ये (Amazon Holi sale 2023) एक असा फोन विक्रीसाठी घेऊन आला आहे. जो पैशांच्या बाबतीत तर खिशाला परवडणारा तर आहेच, शिवाय तो खूपच भारी देखील आहे.

जर तुम्ही स्वस्त:त एक चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा रेडमी फोन तुमच्यासाठी एक चांगली डील आहे, कारण तुम्ही या फोनच्या खऱ्या किंमतीपेक्षा ही खूप कमी पैशांत या फोनला घरी आणू शकता.

Redmi 8A Dual हा फोन Amazon Holi sale मध्ये अगदी कमी पैशात मिळत आहे, जो तुम्ही ऑफर्ससह अगदी 499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय

आता फोन इतक्या स्वस्त:त मिळत असेल फोनच्या फीचर्सबद्दल नक्कीच तुमच्या मनात आलं असेल, चला मग याचे फीचर्स समजून घेऊ.

Redmi 8A Dual मध्ये तुम्हाला 6.22-इंच HD + डॉट नॉच डिस्प्ले मिळेल. ज्यामध्ये 1520 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 19:9 आस्पेक्ट रेशो आणि 2.5D कर्व्ड ग्लास आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 439 ऑक्टा कोर प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. 2GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरीसह हा फोन उपलब्ध आहे.

कॅमेरा

डुअल कॅमेरा सेटअप फोनचा कॅमेरा सज्ज आहे. ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 2MP सेकेंड कॅमेरा आहे. याशिवाय या फोनमध्ये 5000mAh लिथियम-पॉलिमर बॅटरी उपलब्ध आहे. तुम्हाला या डिव्हाइससाठी 1 वर्षाची वॉरंटी आणि बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची निर्माता वॉरंटी मिळते.

हा फोन Amazon वर 7 हजार 999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. पण तरीही हा फोन तुम्ही 499 रुपयांना खरेदी करू शकता. आता ते कसं शक्य आहे? चला पाहू

ई-कॉमर्स साइटवर या फोनवर 7,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर तुम्ही या ऑफरचा पुरेपूर वापर केला तर तुम्हाला हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय, तुम्हाला EMI चा पर्याय मिळेल, जो तुम्ही वापरू शकता. यामध्ये तुम्हाला 382 रुपयांचा EMI पर्याय मिळेल.

First published:
top videos

    Tags: Online shopping, Phone, Sale offers, Smartphone